मनसे कार्यकर्त्यांचा नागपुरात राडा:येस बँकेच्या पाटीला फासले काळे, कर्मचाऱ्यालाही केली मारहाण; शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात येस बँकेच्या शाखेत मोठा राडा केला आहे. या बँकेच्या अधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याच्या जेसीबीचा परस्पर लिलाव केला. त्याची तक्रार शेतकऱ्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर मनसैनिकांनी बँकेवर चालून जात बँकेच्या पाटीला काळे फासले. तसेच एका कर्मचाऱ्याला मारहाणही केली. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. राज्यात सध्या मराठी - अमराठी वादासह डान्स बारच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. मनसेने या दोन्ही मुद्यांवरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठीच्या मुद्यावरून त्यांनी सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा केली. विशेषतः या प्रकरणी त्यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन हिंदीच्या जागी मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरला. यामुळे मोठा वाद झाला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून रायगड जिल्ह्यातील वाढत्या डान्स बारच्या मुद्यावर बोट ठेवले. तद्नंतर मनसैनिकांनी एका डान्सबारमध्ये शिरून तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी आता नागपुरातील येस बँकेत जात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप यासंबंधीच्या माहितीनुसार, येस बँकेने येथील एका शेतकऱ्याचा जेसीबी जप्त केला होता. हा जेसीबी परत मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. बँकेच्या सूचनेनुसार त्याची पैसे भरण्याचीही तयारी होती. पण बँकेने त्यानंतरही त्याच्या जेसीबीचा परस्पर लिलाव केला. हे समजल्यानंतर सदर शेतकऱ्याने मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी त्यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यानंतर मनसैनिकांनी मंगळवारी दुपारी येस बँकेच्या स्थानिक शाखेत धाव घेत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. बँक कर्मचाऱ्यालाही केली मारहाण यावेळी काही कार्यकर्त्यांनी बँकेच्या नामफलकाला काळे फासले. तसेच एका कर्मचाऱ्यालाही किरकोळ मारहाण केली. यावेळी त्यांनी बँकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या अनपेक्षित घटनेमुळे बँकेत एकच खळबळ माजली. सर्वच कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. बँकेच्या अधिकाऱ्याने गरीब शेतकऱ्याची फसवणूक केल्यामुळे आम्ही हे आंदोलन केले. पीडित शेतकऱ्याने बँकेला आपल्या जेसीबीचा लिलाव न करण्याची विनंती केली होती. त्याने आपल्याकडील थकबाकीही भरण्याची तयारी दर्शवली होती. पण त्यानंतरही बँकेने जेसीबीचा लिलाव केला, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी केला. भरत गोगावले यांचा मनसेवर निशाणा दुसरीकडे, मंत्री भरत गोगावले यांनी डान्स बारमधील तोडफोडीवरून मनसेवर निशाणा साधला आहे. बार संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. पण सगळीकडेच हिडीस - फिडीस गोष्टी चालत नाहीत. ज्या बारमध्ये गैरवर्तन होत असेल, चुकीच्या गोष्टी होत असतील, तो भाग वेगळा, पण संपूर्ण महाराष्ट्रात बार आहेत. तिथे काय चालते हे समजून घेणे फार गरजेचे आहे. मुळात बार म्हणजे काय? खाण्या-पिण्याचेही बार असतात. सगळ्याच बारमध्ये नाचगाणी चालतात, अशातला काही भाग नाही. अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्रा चालतात. पण तिथे काही चुकीचे घडत असेल तर सरकार त्या बारवर कारवाई करून बंदी आणेल. करमणुकीच्या काही गोष्टींना परवानगी आहे. सगळ्या बारमध्ये हिडीस - फिडीस काही दाखवले जात नाहीत, असे ते मनसेला उद्देशून म्हणाले आहेत. हे ही वाचा... प्रांजल खेवलकर यांचा जामिनाचा मार्ग मोकळा:पण जामिनासाठी अजून याचिकाच दाखल नाही; खडसे कुटुंबीयांचे राजकारण काय? पुणे - पुण्यातील एका कथित रेव्ह पार्टीसंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई तथा महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. अर्थात यामुळे त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण खेवलकर यांच्यातर्फे अजून कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली नाही. परिणामी, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. वाचा सविस्तर

Aug 5, 2025 - 16:50
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow