महायुती सरकारचा सावळा गोंधळ:एकाच पदाचा पदभार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश; शिंदे, फडणवीसांत संघर्ष आहे का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने एकाच दिवशी दोन वेगवेगळे आदेश काढून एकाच पदाचा पदभार दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे या प्रकरणी नेमक्या कोणत्या आदेशाचे पालन करायचे? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकाराची राज्याच्या वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे कनिष्ठ एकनाथ शिंदे यांच्यातील कथित सुप्त संघर्षाचा हा परिपाक असल्याचेही सांगितले जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सामान्य प्रशासन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास खात्याने हा गोंधळ घातला आहे. या दोन्ही खात्यांनी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार बीएमसीच्या दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश जारी केलेत. विशेष म्हणजे हे आदेश एकाच दिवशी जारी करण्यात आलेत. त्यात फडणवीसांच्या सामान्य प्रशासन विभागाने हा पदभार आशिष शर्मा यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिलेत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याने बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा पदभार अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्याचे निर्देश दिलेत. फडणवीस - शिंदेंत सुप्त राजकीय संघर्ष या दोन्ही नेत्यांच्या विभागांनी एकाच दिवशी आदेश काढून एकच पद वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिल्याने प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. या प्रकरणी नेमक्या कोणत्या विभागाच्या आदेशाचे पालन करायचे? हा विचित्र प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील कथित सुप्त संघर्षातून ही घटना घडल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. कारण, राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळेही या चर्चेला खतपाणी मिळाले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आज बुधवारी पुन्हा एकदा दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत. ते तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामु्ळे या आदेशाचा संबंध शिंदे यांच्या नाराजीशीही जोडला जात आहे. संजय राऊतांचा शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना छेडले असता त्यांनी कुछ बडा होनेवाला है असे सूचक विधान केले. एकनाथ शिंदे याच्या पक्षाचे मुख्यालय दिल्लीत आहेत. त्यामुळे ते दिल्लीत भेटीगाठी घेत असावेत. कुछ तो बडा होनेवाला हैं. पण राहुल गांधी यांनी केलेले विधान महाराष्ट्राशी नव्हे तर दिल्लीच्या राजकारणाशी संबंधित आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा... एकनाथ शिंदे पुन्हा राजधानी दिल्लीत:पीएम नरेंद्र मोदी, अमित शहांची घेणार भेट; उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीत तळ ठोकून, घडामोडींना वेग नवी दिल्ली - सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ते गत आठवड्यातच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा दिल्ली गाठली आहे. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर असताना शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे याविषयी राज्याच्य राजकारणात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. वाचा सविस्तर

What's Your Reaction?






