रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 मुलांना ट्रकने चिरडले:4 जणांचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ; गडचिरोली - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भयंकर घटना

रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 तरुणांना ट्रकने चिरडल्याची भयंकर घटना गडचिरोली जिल्ह्यातील काटली येथे घडली आहे. या अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे अत्यवस्थ आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, काटली येथील 6 तरूण गुरूवारी सकाळी गडचिरोली - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर व्यायाम करत होते. ते कसरत करण्यात पार मग्न झाले होते होते. त्यातच एका भरधाव ट्रकने त्यांना उडवले. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले, तर इतर दोन जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उर्वरित 2 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे काटली गावावर शोककळा पसरली आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करून आपला आक्रोश व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाला शांत करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदीही केली आहे. या प्रकरणी सर्वच वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर प्रस्तुत घटनेत एकाच गावातील 4 मुलांचा बळी गेल्याने काटली गाव सुन्न झाले आहे. गावकऱ्यांनी या भागात सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आणि मद्यपी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रोज सकाळी एकत्र व्यायामाला जाणारी ही मुले आता कधीच परत येणार नाहीत, या कल्पनेनेच संपूर्ण परिसरा हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परभणीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिला ठार दुसरीकडे, परभणी - गंगाखेड मार्गावरही अशीच एक घटना घडली आहे. त्यात अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना उडवले आहे. या घटनेत दोन्ही महिलांचा मृत्यू झाला आहे. पुष्पाबाई उत्तमराव कच्छवे व अंजनाबाई शिसोदे अशी मृतांची नावे आहेत. या दोघी गुरूवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. रस्त्यात त्यांना एका भरधाव वाहनाने त्यांना उटवले. या अपघातामुळे दैठणा गावावर शोककळा पसरली आहे. हे ही वाचा... कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा:एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना; निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश मुंबई - विरोधकांना दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही. कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. वादग्रस्त वक्तव्याने पक्षाचे नाव खराब होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow