रविवारपासून धावणार वंदेभारत:आठवड्यातून 6 दिवस सेवा, अकोला येथे 2 मिनिटाचा थांबा
विदर्भातील प्रवाशांकडून प्रतीक्षेत असलेली नागपूर (अजनी) पुणे स्लीपर वंदे भारत ट्रेन अखेर १० ऑगस्टपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य दोन गाड्यांसोबतच अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. या गाडीला अकोला येथे नुकताच दोन मिनिटाचा थांबा जाहीर झाला आहे. वेगवान गाडीमुळे अकोला-पुणे अंतर ६.५० मिनिटात पूर्ण करता येणार आहे. २६१०२ अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत सकाळी ९.५० वाजता अजनी येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.५० वाजता पुणे पोहोचेल. तसेच २६१०१ पुणे-अजनी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ६.२५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून निघेल आणि सायंकाळी ६.२५ वाजता अजनी (नागपूर) पोहोचेल. असा राहिल अकोल्यात थांबा : २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस वर्धा १०.४०-१०.४२ वाजता, बडनेरा १२.३-१२.५, अकोला दुपारी १-१.२, भुसावळ २.४४-३.००, जळगाव ३.२६-३.२८ असे थांबे घेत पुणे जाईल तर, २६१०१ पुणे-अजनी वंदेभारत एक्स्प्रेस सकाळी ६.२५ वाजता पुण्यातून निघून दुपारी ३.०३ ते ३.०५ वाजता अकोल्यात थांबा घेईल. असे आहेत थांबे व वार अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर- पुण्यादरम्यान चा प्रवास करताना वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि कोपरगाव, अहमदनगर, दौंड, पुणे या स्थानकांवर थांबे घेणार आहे. अजनीवरून सुटणारी गाडी सोमवारी, तर पुण्यातून सुटणारी गाडी मंगळवारी एक दिवस वगळून आठवड्याचे सहा दिवस उपलब्ध असेल.

What's Your Reaction?






