पावसाची वि‌‌श्रांती, तापमान 35 पार; कधी ऊन तर कधी ढग:पुढील 3 दिवस बरसण्याची शक्यताही नाही, रविवारी जलधारा कोसळण्याचा अंदाज

श्रावण महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही पावसाने विश्रांती घेतली असून, कमाल तापमानही ३५ अंश पेक्षा जास्त अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. दिवसभरात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असून, उकाड्यामुळे अकोलेकरा हैराण झाले आहेत. अशातच गुरुवारी ते शनिवारपर्यंतही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला नाही. मात्र रविवार, १० ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह जलधारा कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या नजरा दमदार पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात जूनच्या अखेरीस दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. यंदा जून महिन्याच्या प्रारंभी वरुणराजाने फारशी कृपा केली नाही. मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरवली होती. जुलैप्रमाणे ऑगस्टमध्येही पाठ जुलैमध्ये २२३.२ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना १६८.३ मि.मी. पाऊस पडला. मात्र आता ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. आतापर्यंत सहा दिवसात केवळ ०.९ मि.मी. पाऊस पडला. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक जूनच्या अखेरीस दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. परिणामी महिना संपला तेव्हा १५५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या ११३.८ टक्के होता. महिन्याभरात जिल्ह्यात १३६.९ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. त्यानंतर जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेने ५४.९ मि.मी. कमी पाऊस पडला.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow