पंढरपुरात रेल्वे पुलाच्या कामामुळे कोंडी, पर्याय मार्गही बंदमुळे वाहनधारकांची दैना:कराड रोडवरील रेल्वे अंडर पास 20 दिवसांसाठी बंद‎

रेल्वे प्रशासनाचा मनमानीपणा, पंढरपूर नगरपालिकेच्या नियोजनाचा अभाव आणि शहर वाहतूक शाखेचा बेजाबदारपणा या तिघांच्या नियोजन शून्य कारभारामुळे पंढरपूरकर नागरिक आणि वाहनधारकांची कोंडी झालेली आहे. दवाखान्यात जाणारे रुग्ण, शाळेत जाणारे विद्यार्थी, विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक, प्रशासकीय कामासाठी आलेले नागरिक या सर्वाना रेल्वेच्या मनमानीपणामुळे त्रास सहन करावा लागला आहे. कराड रोडवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ रेल्वे लाईन खाली अंडर पास आहे, पाच दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने एक पत्रक कढून ५ ते २५ ऑगस्ट हा अंडर पास दुरुस्तीसाठी बंद करण्यात येत असल्याचे फर्मान काढले. ५ ऑगस्टच्या रात्री बॅरिकेड्स लावून हा अंडर पास बंद करण्यात आला. बुधवारी पहाटेपासून या मार्गाने नेहमी चालणारी रहदारी विस्कळीत झाली.विशेष म्हणजे रेल्वेने या कामास सुरुवात करताना जे पर्यायी मार्ग दिले होते. त्यापैकी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय ते डीव्हीपी मल्टिप्लेक्स हा मार्गही डीव्हीपी जवळ वाहतुकीसाठी आठ दिवसांपासून बंद करण्यात आलेला आहे. पालखी महामार्गाचे काम सुरु आहे. त्याच मार्गावर वाहतूक वळवण्यात आल्याने अधिक कोंडी झाली. दोनही दुहेरी वाहतूक चालणारे अंडर पास वाहतूकीसाठी कोंडी करणारे ठरत आहेत. त्याचवेळी वाहनचालक पर्याय म्हणून ज्या कुंभार गल्ली आणि लक्ष्मी टाकली हद्दीतील अंडर पासकडे धाव घेतात मात्र हे मार्ग एकेरी आणि अरुंद असल्याने त्याठिकाणी सुद्धा वाहतुकीची कोंडी होते. ^रेल्वे प्रशासनाने कराड रोडवरील अंडर पास २० दिवस बंद करण्यात येत असल्याचे पत्र दिलेले होते. पुत्रदा एकादशी होईपर्यंत काम पुढे ढकलण्याची सूचना केलेली होती. हे काम कधी तरी करावे लागणार आहे. तरीही दोन दिवसात एका बाजूचे काम पूर्ण करून एका बाजूने वाहतूक सुरु करू, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. विश्वजित घोडके, शहर पोलिस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालजवळील रेल्वे पूल बंद असल्याची कल्पना नसलेले वाहचालक, विद्यार्थी, पादचारी याच मार्गाने येत होते आणि येथील लोखंडी बॅरिकेड्स पाहून आता कसं करायचं ? या विवंचनेत पडत होते. विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दवाखान्याकडे निघालेले रुग्ण यांचे या ठिकाणी मोठे हाल झाले. रस्त्याची कोंडी झाल्याने दुचाकीस्वार आपल्या दुचाकी तीन ते चार फूट उंच उचलून दुसऱ्या मार्गावर ठेवताना बाहुबली होत होते. जेष्ठ नागरिकांनाही वयभान विसरून मेटाकुटीला येऊन चढाई करावी लागत होती. कराड नाका आणि या बाजूच्या उपनगरी भागातील नागरिकांना सरगम चौकाच्या पुलाकडे जाण्यासाठी बाजार समितीच्या आवारातून एक मार्ग दिवसभर उपलब्ध असतो. मात्र रात्रीच्या वेळी तो मार्गही बंद केला जातो. मार्केट कमिटीमधील मार्ग रात्रभर सुरु ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल रेल्वे २ दिवसात एक मार्ग सुरु करेल मार्केट कमिटीचा रस्ता बंद : डीव्हीपी जवळ नाकेबंदी

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow