ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घ्या तरच जीवनात यशस्वी व्हाल:प्राचार्य अरुण घनवट यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनातच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, ते ध्येय गाठण्यासाठी अपार परिश्रम घ्या तरच जीवनात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन नेवासेफाटा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण घनवट यांनी केले ज्ञानेश्वर महाविद्यालयात आयोजित अकरावी वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थ ींनींचा स्वागत समारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ. घनवट बोलत होते. कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा. राधाताई मोटे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनील गर्जे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. लक्ष्मी कांगुणे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अजय पाटील, कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब माळी, प्रा डॉ संजय घनवट, मेजर प्रा. सुभाष आगळे, प्रा. अजय पवार प्रमुख उपस्थित होते. उपप्राचार्या मोटे म्हणाल्या, जीवनात ज्ञानच आपली खरी संपत्ती आहे. तीच संपत्ती आपल्याला या स्पर्धेच्या युगात तारू शकते. त्यामुळे ज्ञान घेतांना इतके सखोल घ्या की आपण प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवले पाहिजे. डॉ. लक्ष्मी कांगुणे म्हणाल्या, चित्रपट हे करमणुकी पुरतेच साधन आहे. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी आभासी जगात न वावरता शिक्षण घेत असतांना आपण वास्तवाचे भान ठेवणे गरजेचे आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल असा विश्वास वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ. लक्ष्मी कांगुणे यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. लक्ष्मी कांगुणे, डॉ. अजय पाटील, प्रा गोवर्धन रोडे, प्रा संदीप तोगे, प्रा हरिश्चंद्र माने, प्रा. डॉ. कविता जाधव, प्रा. ज्योती भोगे, मेजर प्रा रेणुका सरगय्ये यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रा. ज्ञानेश्वर पुराणे यांनी केले. यावेळी अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना गुलाबपुष्प व पेन देवून स्वागत करण्यात आले. प्रा सुजय नवले, प्रा. सुभाष सोनवणे, प्रा. रामराव काळे, प्रा. किरण कदम, प्रा. संजय घावटे, प्रा . हरिश्चंद्र पंडित, प्रा संगीता नवले, प्रा सुकन्या फाटके, प्रा. साक्षी रेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देविदास साळुंके यांनी, तर आभार प्रा. भागवत विरकर यांनी मानले.

What's Your Reaction?






