सीमेवर श्रीगोंदे येथील महादजी शिंदे कॉलेजच्या राख्यांद्वारे होणार रक्षाबंधन

श्रीगोंदे रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, श्रीगोंदे येथील विद्यार्थिनी व महिला शिक्षिकांनी देशभक्तीचा आदर्श घालून देत भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ३ हजार राख्या पाठवल्या. या उपक्रमामुळे रक्षाबंधनाचा पवित्र सण सीमा भागातही भावनिक आणि आत्मियतेने साजरा होणार आहे. या उपक्रमाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील स्काऊट पथकाच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्यांसोबत शुभेच्छा संदेशही लिहिले, तर काही विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करणारे संदेश सार्वजनिकरित्या वाचून उपस्थितांचे मन जिंकले. विद्यालयातील महिला शिक्षिकांनीही सहभाग घेत स्वतःच्या हस्ताक्षरात देशासाठी रक्षण करणाऱ्या वीर जवानांसाठी संदेश पाठवले. या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी विद्यालयात शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजी जगताप, पीटर रणसिंग, प्राचार्य दिलीप भुजबळ, उपप्राचार्य शहाजी एकाड, पर्यवेक्षिका सुनिता काकडे उपस्थित होते.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow