परंपरा भूतकाळातून मिळते व उज्ज्वल भविष्याकडे नेते:भारतीय ज्ञान परंपरा विषयावर डॉ.पाटील यांचे व्याख्यान

पिंपळे अमळनेर तालुका भारत सरकार शिक्षा मंत्रालय विभाग केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे श्रीलंकेहून आलेल्या हिंदी शिक्षकांसाठी सुरू असलेल्या रिफ्रेशर कोर्स अंतर्गत ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर अमळनेर तालुक्यातील खोकरपाट येथील रहिवासी तसेच विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख डॉ. योगेश पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानाचे संचालक डॉ. सुनील बाबुराव कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ. हुकूमचंद मीना, तसेच आंतरराष्ट्रीय हिंदी विभागाचे डॉ. पुरुषोत्तम पाटील, संयोजन डॉ. रेणू चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. योगेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानात समृद्ध भारतीय ज्ञान परंपरेची वैशिष्ट्ये उलगडून दाखवली. त्यांनी वेद, उपनिषदे, आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, न्यायशास्त्र, नीतिशास्त्र, शिल्पकला, संगीत, साहित्य आणि गुरुकुल परंपरा यांचा समावेश करत भारताच्या समृद्ध प्राचीन ज्ञान परंपरेची सखोल माहिती दिली. परंपरा या शब्दाचा विशेष अर्थ त्यांनी सांगितला. केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे व्याख्यानास उपस्थित मान्यवर. भारतीय संत परंपरा मानवतावादी वर्तमान काळात जे अनुपयोगी आहे ती कधीही परंपरा असू शकत नाही. यावेळी गुरु शिष्य परंपरा तसेच भारतीय संत परंपरा मानवतावादी आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रस्तावना संयोजक डॉ. रेणू चौधरी यांनी केले. व्याख्यानास श्रीलंकेहून आलेले शिक्षक, संस्थेतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ज्ञान परंपरेबाबत नव्याने प्रेरणा घेतली.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow