शिंगवे - मेसनखेडे सोसायटी अध्यक्षपदी गंगाधर बिडगर:उपाध्यक्षपदी आसराबाईथोरात अविरोध निवड
तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील शिंगवे - मेसनखेडे - दहेगाव या तिन्ही गाव मिळून असलेल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गंगाधर बिडगर तर उपाध्यक्षपदी आसराबाई थोरात यांची अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी गंगाधर बिडगर व उपाध्यक्ष पदासाठी आसराबाई थोरात यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. गंगाधर बिडगर यांच्या सूचक म्हणून रंजनाबाई ठोंबरे तर अनुमोदन अंबादास ठोंबरे होते. आसराबाई थोरात यांना सूचक म्हणून संतोष पवार तर अनुमोदन शंकर थोरात यांनी दिले. निवडणुकीसाठी सचिव भिला व्हडगर यांनी सहाय्य केले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती नितीन आहेर, उपसभापती पंढरीनाथ खताळ, संचालक गणेश निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार केला.

What's Your Reaction?






