पालखी मार्गाचे काम रखडलेलेच:18 जूनला पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे होणार प्रस्थान
राज्यातील प्रमुख दिंड्यांमध्ये पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या दिंडीचा समावेश होतो. नाथांची पायी दिंडी १८ जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान करत आहे. संत एकनाथ महाराज यांच्या दिंडीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पैठण ते पंढरपूर व पहिल्या टप्प्यात पैठण ते नगर जिल्ह्यातील खेडापर्यंतच्या पालखी मार्गासाठी ७०५ कोटी रुपये सन २०१७-१८ मध्ये मंजूर केले होते. तसेच पालखी मार्गाचे काम सुरू झाले. काही ठिकाणी रस्ताही झाला. मात्र तो निकृष्ट झाला व आता अनेक तो रस्ता अपूर्ण असल्याने यंदा देखील हजारो वारकऱ्यांना पायी वारीत खडतर मार्गाने जावे लागणार आहे. पैठणच्या पालखी मार्गावरून पन्नासहून अधिक दिंड्या पंढरपूरसाठी जातात. या दिंड्यांचा मार्ग ७०५ कोटी रुपये पालखी मार्गासाठी देऊनही खडतर मार्गाने पायी जावे लागणार असल्याची खंत संत एकनाथ महाराज पालखीप्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पालखी मार्गावरील समस्या संदर्भात निवेदन दिले. आले हरीचे डिंगर, वीर वारीकर पंढरीचे... या भक्तिमय अभंगाप्रमाणे खांद्यावरील भगवी पताका उंचावत टाळ, मृदंगाचा गजर व ऊन, पावसाची पर्वा न करता शेकडो वर्षांपासून पैठणची संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरला जाते. मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र असा प्रवास एकनाथांच्या पालखीचा होतो. शेकडो मैलाचा पायी प्रवास वारकरी करतात. पैठण ते पंढरपूर या मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पालखीच्या १९ दिवसांच्या मुक्कामात पालखी मार्ग जणू अडथळा बनला आहे. या विरोधात प्रशासनाला निवेदन दिले. मार्गाचे काम सुरू : ^पालखी मार्गाची कामे सुरू झाली आहेत. काही ठिकाणी कामे झाली नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे होत आहेत. पैठण तालुक्यातील ज्या गावातून पालखी जाते तो रस्ता चांगला आहे. -राजेंद्र बोरकर, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मार्गासाठी पाठपुरावा करून काम करू ^ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पालखी मार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. राज्य सरकारच्या माध्यमातून पालखी मार्ग लवकर कसा होईल. यासाठी प्रयत्न करू. वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही यासाठी विशेष नियोजन प्रशासन करेल. त्या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. -विलास भुमरे, आमदार

What's Your Reaction?






