अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीची त्वरित भरपाई द्या:शेतकऱ्यांची मागणी, समस्या असल्यास थेट संपर्क साधा- खासदार प्रणिती शिंदे‎

मोहोळ अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. प्लॅनमध्ये नसणारे रस्ते ग्रामपंचायतीने प्लॅनमध्ये आणावेत. वरकुटे येथील उप रुग्णालयांतर्गत अंकोली रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात २४ तास डॉक्टरांची व्यवस्था करण्यात यावी. जनतेने काही समस्या असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील मौजे वरकुटे, वडदेगाव गाव भेट दौऱ्यावेळी गुरुवारी केले. यावेळी त्या बोलत होत्या. गाव भेट दरम्यान ग्रामस्थांच्या तक्रार ऐकून घेत समस्या सोडण्याचा प्रयत्न केला. या गाव भेट दौऱ्यास जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, मतदार संघासाठी केंद्र शासनाकडून बहुतांश निधी उपलब्ध करून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, काँग्रेसचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुलतान तांबोळी, अप्पासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील गावभेट दौऱ्यात शेतकऱ्यांना आधार दिला. अवकाळी पावसाने शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम खासदार शिंदे यांनी केले.

Jun 1, 2025 - 03:02
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow