अहिल्यादेवींना 300 वर्षांनी न्याय मिळाला:गोपीचंद पडळकर यांचे विधान; शंभूराजेंच्या नावाने लव्ह जिहादचा कायदा करण्याची मागणी
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी अहिल्यादेवी होळकरांना तब्बल 300 वर्षांनी न्याय मिळाल्याचा दावा केला. अहिल्यादेवी यांनी 1770 मध्ये काशी विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर आम्ही चोंडी येथील सभामंडपासाठी 10 वेळा हेलपाटे मारले, पण पैसा मिळाला नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात 700 कोटींचा निधी दिला. अशाप्रकारे अहिल्यादेवी यांना 300 वर्षांनी न्याय मिळाला, असे ते म्हणाले. अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी येथे शनिवारी त्यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे हजर होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी उपरोक्त भावना व्यक्त केली. ते म्हणाले, आजमी काहीही मागणार नाही. पण आरक्षणाचा विचार सर्वांच्या मनात आहे. ओबीसी आरक्षण गेल्यात जमा होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांनी ते टिकवून दाखवले. त्यामुळे आम्ही सर्वजण बाजीप्रभूंसारखे प्रामाणिक आहोत. अहिल्यादेवींचे नाव धर्मांतर बंदी कायद्याला द्या राज्यात लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायद्याला अहिल्यादेवी होळकर, तर लव्ह जिहादविरोधी कायद्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही जातीसाठी नव्हे तर देशासाठी कार्य केले. पण इतिहासकारांनी त्यांचा इतिहास लिहिला नाही. यशवंतराव होळकर व मल्हारराव होळकर यांचा इतिहास लिहिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी उचलली, असे ते म्हणाले. फडणवीसांच्या काळात राज्यभर जयंती सुरू झाली अहिल्यादेवी यांचा भाषणात उल्लेखन न करणारे काही कृतीशून्य राजकारणी आहेत. पण देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी होण्यास सुरुवात झाली. आम्ही यासाठी कायम आंदोलने केली. पण कुणीही दखल घेतली नाही. काही राजकारण्यांनी होळकर घराण्यावर कायम अन्याय केला. पण भाजप सरकारने एका वर्षातच अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. अहिल्यादेवींनी 1770 साली काशी विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच मंदिराचा जिर्णोद्धार केला. आम्ही चोंडी येथे सभामंडप मिळवण्यासाठी 10 वेळा हेलपाटे मारले. पण निधी मिळाला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात चोंडीसाठी 700 कोटींचा निधी मंजूर केला. अहिल्यादेवी यांना 300 वर्षांनंतर न्याय मिळाला, असेही गोपीचंद पडळकर यावेळी बोलताना म्हणाले. हे ही वाचा... राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का?:शरद पवारांनी अवघ्या 3 शब्दांत टोलवला विषय; एकत्र येण्यावर पक्षांतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट संकेत पुणे - राज्याच्या राजकारणात गत काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यासंबंधीच्या एका विधानामुळे या चर्चेला उत आला आहे. पण आता शरद पवारांनीच या चर्चेविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे नमूद करत कानावर हात ठेवलेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाचा सविस्तर

What's Your Reaction?






