वनरक्षक आरती फुले यांचे अनोखे कार्य:सारस पक्षी संवर्धनासह २०० पक्ष्यांची 'ई-बर्ड' पोर्टलवर नोंद

गोंदीया जिल्ह्यात मुर्दोली रोपवाटिकेत कार्यरत वनरक्षक आरती फुले या सारस संवर्धनासाठी काम करतात. आपली ड्यूटी पूर्ण करून त्या नंतरचा वेळ त्या आवडत्या सारस संवर्धनासाठी देतात, असे फुले यांनी सांगितले. माझ्याकरीता ड्यूटी फर्स्ट आहे. नंतर सारस संवर्धनाचे काम आवडीने करते, असे त्या म्हणाल्या. आरती फुले सारस पक्ष्याच्या आरामाची जागा, पुनरुत्पादन अधिवास आणि अन्नासाठी वापरल्या जाणाऱ्या भ्रमण मार्गाचा सराव करतात. तसेच सारसाच्या अधिवास असलेल्या ठिकाणी किवा त्यांच्या सभोवताल राहणाऱ्या शेतकऱ्यांना सारस पक्षाचे महत्व पटवून देत सारस पक्षाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रवृत्त करतात. गावागावात जाऊन सारस पक्ष्यांचा नैसर्गिक वावर, त्यांचे स्थलांतर, घरटी करणे या हालचालींविषयी जनजागृती करतात. शालेय विद्यार्थ्यांना माहिती देतात. या करीता त्यांनी सारस मित्र जोडले. अशा २० सारस मित्रांचा व्हाॅटसएप ग्रुप तयार केला. हे सारस मित्र ग्रुपवर माहिती देतात. सारस आढळतो त्या ठिकाणच्या लोकांना आरती फुले स्व:त भेटतात. कुठेही फिरायला गेल्या तरी सोबत दुर्बीण आणि कॅमेरा असतो. त्यांना पक्षी निरीक्षणाचाही छंद आहे. त्या हे काम आवड आणि हौसेने करतात. भारतातील २०० पक्ष्यांची ओळख त्यांनी "ई-बर्ड' पोर्टलवर केली आहे. २०१२ पासून त्या वनखात्यात आहे. २०२० पर्यत पेंचमध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दलात काम केले. वाघांचा पाठलाग करणे आवाहन असते असे फुले यांनी सांगितले. तीन ते चार किलोची अंडी पायाची नखे ते चोच असा किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भात शेतातच स्वत:चे घर करणारा आणि त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाची अंडी घालतो. गम्मत म्हणजे अंडी उबवण्याचा अधिकार फक्‍त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत सारसामध्ये नर सारस अंडी उबवतो. एकाच जोडीदाराबरोबर सहजीवन ​​​​​​​रामायणासह पुराणातही सारस पक्ष्याचे उल्लेख आढळतात. सारस नेहमी जोडीने राहतो आणि फिरतो. एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ असलेला सारस जोडीदाराला मरेपर्यंत सोडत नाही. दोघांपैकी एकाच मृत्यू झालातर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो. असे म्हणतात कि एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या पती-पत्नीला सारस पक्ष्याच्या सान्निध्यात ठेवण्याची प्रथा भारतात एकेकाळी होती.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow