तालिबानच्या नवीन चौकीवरून वाद, पाकची चेकपोस्ट उडवली:पाक सेना-तालिबान चकमक; अडीच लाख लोकांना घरे सोडण्याचे आदेश

अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतातील बहराम चह हे ठिकाण, जे पाकिस्तानच्या चगई जिल्ह्याला लागून असलेले सीमावर्ती शहर आहे, ते पुन्हा एकदा सशस्त्र संघर्षाचे केंद्र बनले आहे. पाकिस्तानी सुरक्षा दले आणि तालिबान यांच्यात ३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या चकमकी आता तीव्र झाल्या आहेत. तालिबानने सीमा सुरक्षित करण्यासाठी नवीन चौकी (चेकपोस्ट) उभारण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा वाद सुरू झाला. याला पाकिस्तानी सैन्याने कराराचे उल्लंघन असल्याचे सांगत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, तालिबानने पाक चेकपोस्टवर हल्ला केला. ताेफगाेळे डागल्यामुळे चेकपोस्ट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या वाढत्या संघर्षामुळे चगई जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक लोकांना पाकिस्तानच्या शहबाज सरकारने तातडीने घरे सोडण्याचे आदेश दिले आहेत. तालिबाननेही आपल्या नागरिकांना हे क्षेत्र रिकामे करण्यास सांगितले आहे. या परिस्थितीमुळे आधीच कटू असलेले पाक-अफगाण संबंध आणखी ताणले गेले आहेत. विशेष म्हणजे, बहराम चह चेकपोस्ट ड्युरंड रेषेवर स्थित आहे. हे ठिकाण अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची ने-आण आणि विद्रोही कारवायांसाठी एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. याव्यतिरिक्त, तेथून चगई, हेलमंदमधील लष्करी हालचालींवरही नियंत्रण ठेवता येते. पाकिस्तानी सैन्यासाठी ते नष्ट होणे एक मोठे संकट निर्माण करू शकते. दोन्ही देश सतर्क :तालिबानने तैनात केले ५० आत्मघाती हल्लेखोरांचे पथक भीतीमुळे पाकिस्तानी सैन्य चारपेक्षा जास्त चौक्या सोडून पळून गेले इकडे... तालिबानला बलुच बंडखोरांचा पाठिंबा बहराम चह येथे पाकिस्तानी सैन्य आणि तालिबान यांच्यातील अलीकडील चकमकींमुळे प्रादेशिक अस्थिरता वाढली आहे. सूत्रांनुसार, तालिबानला बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. बीएलए, जी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे, तिने अलीकडेच ‘ऑपरेशन हिरोफ २.०’ अंतर्गत ५१ पेक्षा जास्त ठिकाणी ७१ समन्वित हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान, बीएलएनेही पाकिस्तानविरुद्ध आपल्या सशस्त्र कारवाया तीव्र करण्याची घोषणा केली आहे.

Jun 1, 2025 - 02:59
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow