भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांची जोरदार तयारी, पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. महायुती सरकारमधील महत्त्वाचा पक्ष भाजपने ग्रामीण पातळीवर पक्ष वाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वी भाजप 58 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली होती. आता उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाने अखेर राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. यापूर्वी पक्षाने 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, उर्वरित 22 जिल्ह्यांच्या बाबतीत स्थानिक राजकीय समीकरणे आणि अंतर्गत मतभेद यांमुळे यादी काही काळासाठी रखडली होती. आता स्थानिक आणि केंद्रीय नेत्यांमध्ये समन्वय साधून, संबंधित जिल्ह्यांमधील चर्चा पूर्ण झाल्यानंतर या उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सिंह, सह-संघटनमंत्री शिवप्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर आता नाशिक, नगर, बीडसह इतर प्रमुख जिल्ह्यांचे अध्यक्ष घोषित करण्यात आले आहेत. 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा

Jun 1, 2025 - 03:02
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow