मी बारामतीत येतोय... दम असेल तर अडवा:लक्ष्मण हाकेंचा सुरज चव्हाणवर हल्लाबोल; तू चिल्लर आहेस, आधी अजितदादांचा सल्ला घे!

सुरज चव्हाणला सांगा मी रात्र-दिवस वाड्या-वस्त्यावरती फिरतो आहे. गावगाड्यात फिरतोय. रोज जवळजवळ दोन ते तीन जिल्ह्याची सीमा ओलांडत आहे. सरुज चव्हाण यांच्या अंगात खूप खुमखुमी असेल तर आज मी बारामतीमध्ये आहे, पंधऱ्याला येत आहे, बारामती शहरात येत आहे. तुझ्यात आणि तुझ्या अजितदादांच्या कार्यकर्त्यांना माझे चॅलेज आहे मी आज बारामतीमध्ये येत आहे, तुमच्यात दम असेल तर बारामतीमध्ये या, असे म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना ओपन चॅलेज दिले आहे. दरम्यान पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्हाला धमक्या आम्ही सरळ युद्धात लढणारी माणसं आहोत लपून छपून नाही. त्यामुळे सुरज चव्हाण तू तर खूप चिल्लर आहेस. बारामतीमध्ये दादाला विचार ना निरावागजमध्ये पंधऱ्यामध्ये गेल्यावर काय होत. त्यामुळे तू अगोदर अजितदादांचा सल्ला घे असा टोला लक्ष्मण हाके यांनी सुरज चव्हाण यांना लगावला आहे. कोकाटेंवर हल्लाबोल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत हाके म्हणाले, अजितदादांचे लोक वादग्रस्त बोलण्याशिवाय काही करू शकत नाहीत. हे सगळे मुंबईत बसून ओबीसी, शेतकरी, कष्टकऱ्यांचे टाळूवरचे लोणी खातात. त्यांचा नेताच तसाच आहे. अजित पवार यांना कुठलाच आचार-विचार नाही. सत्ता कुठे असेल, तिकडे ते झुकतात. पहाटे पहाटे सत्तेसाठी शपथ घेतात, मग थोडी ध्यानधारणा, विपश्यना त्यांनी करायलाच हवी!" अमोल मिटकरींचा हाकेंवर पलटवार लक्ष्मण हाके यांच्या आरोपांवर आमदार अमोल मिटकरी यांनीही तिखट भाषेत उत्तर दिलं आहे. हाके यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये मिळालेली मते पहा. 2014 साली त्यांनी वकीलाकडून 50 हजार रुपये घेऊन निवडणूक लढवली आणि फक्त 527 मते मिळवली. तुझ्याकडे जी गाडी आहे, ती स्वतः घेतली की लोकांनी दिली हे सांग. तुला मिळालेली एकूण मते साडेसहा हजारही नाहीत. आणि तुला वाटतं तू अजितदादांशी तुलना करतोस?. तू मराठा-ओबीसी वाद पेटवतोस. ओबीसीसाठी काय केले, हे सांग. मी आमदार झालो, गावात माझी ग्रामपंचायत निवडून आणली. जिल्हा परिषदेत पराभूत झालो, पण सन्मानाने लढलो!

Jun 1, 2025 - 03:02
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow