थायलंड वर्ल्ड कप:जित कुने दो मार्शल आर्टमध्ये विवेक, अजिंक्यला रौप्यपदक
थायलंड पर्यटन व खेल मंत्रालय आयोजित थाई मार्शल आर्ट फेस्टिव्हल थाई समिती, जित कुने दो फेडरेशन, उजबेकीस्थान संयोजित ७ व्या थाई मार्शल आर्ट फेस्टिवल अंतर्गत जित कुने दो मार्शल आर्टच्या स्पर्धा २० ते २७ मे दरम्यान एम. बी. के. नितीबगृत स्टेडियम, बँकॉक, थायलंड येथे झाली. त्यामध्ये भारताच्या संघात "इंडिया जितकुनेदो " फेडरेशन संलग्न जित कुने दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, जिल्ह्याचे खेळाडू विवेक नंदकिशोर नृपनारायण व अजिंक्य चंदन वानखडे यांनी १४ वर्षाखालील गटात रौप्य पदक जिंकले. या दोन्ही विजेत्यांचा जित कुने दो मार्शल आर्ट फेडरेशनचे ग्रँडमास्टर किम, सचिव तैमूर महमदजानव यांच्या हस्ते पदक ट्रॉफी देऊन सत्कार केला. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी त्यांचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शिवाजीराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे गुणवंत जानोरकर, नितीन भुजाडे, रवींद्र तेलंगे, विधिज्ञ विद्याधर सरकटे, कुंदन लहाने, पवन झोल, बबलू बाहोरिया, सूरज मेगे, सोमय्या लोढा, शैलेश मानकर यांनी कौतुक केले, अशी माहिती देण्यात आली.

What's Your Reaction?






