रूपाली चाकणकर खोटे बोलू नका:ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा प्रिया फुके प्रकरणात 7 पानी पुरावा दाखवत घणाघात
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्याविरोधात आयोगाकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावा केला होता. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी 7 पानी पुरावा दाखवत त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. रूपाली चाकणकर यांना काम करायचे नाही हे स्पष्ट आहे. पण त्यांनी त्यासाठी खोटे नये, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार परिणय फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी आपल्या कुटुंबीयांवर कौटुंबिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही त्यांचा दावा आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी यावर भाष्य करताना परिणय फुके यांच्याविरोधात आयोगाकडे एकही तक्रार आली नसल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. तुम्हाला काम करायचे नाही हे स्पष्ट आहे सुषमा अंधारे शनिवारी एका पोस्टमध्ये म्हणाल्या की, परिणय फुके यांच्या भावजयीने महिला आयोगाकडे कुठलाही अर्ज केला नव्हता असे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले. मात्र 24 जून 2024 रोजी प्रिय फुके यांनी रीतसर 7 पाणी अर्ज केला होता. हे सहा दिवस आधी मी पत्रकार परिषदेतही सांगितले आहे आणि आत्ता त्याची इथे प्रत शेअर करत आहे. तुम्हाला काम करायचे नाही हे स्पष्ट आहे. मात्र त्यासाठी खोट बोलू नका. पीडित तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा सर्व मार्गांनी प्रयत्न करतात. सदरची पिडित ही दोन लहान मुलांची आई आहे. तिने आपल्याला टोल फ्री नंबरवर फोन करावा, तर टोल फ्री नंबर आपले लागत नाहीत. नागपूरहून इथे येणे लहान मुलांना सोडून शक्य होत नाही. हा पत्रव्यवहार आपल्याला त्यांनी ई-मेल आणि पोस्टल या दोन्ही पद्धतीने केलेला आहे, असे त्या चाकणकरांना उद्देशून म्हणाल्या. प्रिया फुकेंच्या पत्रात परिणय फुकेंवर गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या पत्रात प्रिया फुके यांनी गैरअर्जदार/आरोपी म्हणून परिणय फुके यांचा उल्लेख केला आहे. माझे पती संकेत फुके यांच्या मृत्यूनंतर मला व माझ्या मुलांना सासरच्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला. वारंवार रूममध्ये येऊन आमच्या सामानाची चेकिंग करणे, चोरीचे खोटे आरोप करून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, महत्वाची कागदपत्रे जबरदस्तीने घेणे, शिळे अन्न खायला देणे, मुले जेवताना त्यांचे ताट फेकून देणे असे प्रकार आमच्यासोबत होत होते. माझ्या पतीच्या नावे असलेले दुकान, प्लॅट हे नितीन फुके, परिणय यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे त्याची मागणी केली असता तुला जे करायचे ते करून घे, असे धमकावतात, , असे प्रिया फुके यांनी म्हटले आहे. आमचीही बाजू ऐकूण घ्या, फुकेंच्या आईचे आवाहन दुसरीकडे, प्रिया फुके यांच्या सासू तथा परिणय फुके यांच्या मातोश्री रमा फुके यांनी सुषमा अंधारे व रोहिणी खडसे यांना आपलेही म्हणणे ऐकूण घेण्याचे आवाहन केले होते. तु्ही प्रिया फुके यांचे म्हणणे ऐकूण घेतले. तिच्यावर विश्वास ठेवून माध्यमांना माहिती दिली. मी सुद्धा एक महिला व आई आहे. माझ्या कुटुंबावर आरोप करण्यापूर्वी माझीही बाजू समजून घेतली असती, चर्चा केली असती तर तुम्हाला खरी वस्तुस्थिती कळली असती आणि डोळेसुद्धा उघडले असते, असे त्यांनी म्हटले होते.

What's Your Reaction?






