ट्रम्प 2.0:अमेरिकेत ट्रम्प यांनी 130 दिवसांत 11 निर्णय फिरवले; 180 कोर्टाने रोखले
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होऊन १३० दिवस लोटले. मात्र त्यांच्या धोरणाबाबत वाद कायम आहे. कायदेशीर आव्हाने थांबायचे नाव घेत नाहीत. आतापर्यंत अमेरिकी कोर्टाने ट्रम्प प्रशासनाच्या कमीत कमी १८० कार्यकारी आदेश आणि धोरणांवर अस्थायी/स्थायी बंदी घातली आहे. खुद्द ट्रम्प यांनी ११ निर्णयांवर यू-टर्न घेत ते बदलले. रिपोर्टनुसार, कोर्टाने जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणणे, संघीय कर्मचाऱ्यांना सामूहिकरीत्या बरखास्त करणे आणि परदेशी मदत रोखणे यासारखे आदेश अवैध वा घटनाबाह्य ठरवले. ट्रम्प यांनी फेडरल फंडिंग फ्रीझ, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसा आणि टेरिफ धोरणांसारखे निर्णय अनेकदा बदलले वा परत घेतले. ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाविरुद्ध आतापर्यंत २५० हून अधिक खटले दाखल झाले आहेत. जाणकारांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांनी कोणताही विचार करता घाईगडबडीत धोरण लागू केल्याने त्यांना कोर्टात आव्हान दिले जात आहे. त्याशिवाय प्रोजेक्ट २०२५ लागू करण्याला (त्यात कायदे आणि नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत) विरोध होत आहे. ट्रम्प यांच्या काही आदेशामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. चीनमध्ये मस्क यांचे व्यावसायिक हित जोडले असल्याने संघर्ष वाढला ट्रम्प यांच्या निवडणूक अभियानात २१०० कोटी रुपये निधीचे खुलेआम समर्थन करणारे उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याचे मोठे कारण म्हणजे मस्क यांचे चीनमध्ये असलेले व्यावसायिक हितसंबंध. असे महत्त्वाचे आदेश जे कोर्टाने बदलले टेरिफ-बर्थराइटचे निर्णय स्वत: बदलण्यास बाध्य

What's Your Reaction?






