आमच्या सुखात मिठ कालवू नका, आम्हीच मिठागरे निर्माण करणारे:उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले; कोळी बांधवांची घेतली भेट
सरकारने आमच्या सुखात मिठ कालवू नये. कारण आम्हीच मिठागरे निर्माण करणारे असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोळी बांधवांनी एकजुटीने राहावे. तुमच्यावर होणारा अन्याय सहन करू नका, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र, तो अन्यायच तोडून टाका, असे मी म्हणत असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. कोळी वाडा आणि विविध समस्यांसाठी आज कोळी बांधवांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. कोळी बांधवांच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, आणि गुण्यागोविंदाने राहणारे लोक आहोत. मात्र आमच्या सुखामध्ये मीठ घालण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मिठागरे निर्माण करणारे लोक आहोत. सर्व कोळी बांधवांनी एकत्र व्हावे आणि एकजुटीने राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले. सरकार आधी पिल्लू सोडून देते आणि अंगावर आले की झटकून टाकते. काही दिवस शांत बसायचे. मात्र, त्यांना जे करायचे ते तेच करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपला हा लढा अद्याप संपलेला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. माणिकराव कोकाटे यांना टोला बऱ्याच वर्षांनंतर आता एका माणसाला आवडीचे खाते मिळाले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात ठाकरे यांनी माणिकराव कोकाटे यांना टोला लगावला आहे. आता रम्मी या खेळाचा समावेश ओलिंपिक मध्ये होईल, असे मी वृत्तपत्रात देखील छापून आलेले पाहिले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे कोणालाही मंत्री पद दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदी सक्तीवरून टीका आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाही. मात्र सक्ती करू नका, असे आवाहन देखील पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला. आमचा हिंदीला विरोध नाही. मात्र, राज्यात दुसऱ्या भाषेची सक्ती करु देणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दुसऱ्या पक्षात भ्रष्टाचार करुनच भाजपमध्ये जा या वेळी उद्धव ठाकरे यांनी गमतीदार पद्धतीने भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, एका मुलाला वडिलांनी विचारले की, तु काय करणार आहेस. तर तो मुलगा म्हणाला मी भाजपमध्ये जाऊन सेवा करणार आहे. तर त्याला वडिल म्हणाले थेट भाजपमध्ये जाऊ नको. आधी दुसऱ्या पक्षात जा, तेथे काहीतरी भ्रष्टाचार कर आणि नंतर भाजपमध्ये गेल्यावर तुला सन्मानाची वागणूक मिळेल. थेट भाजपमध्ये गेला तर दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतील, असे देखील वडिलांनी त्या मुलाला सांगितले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

What's Your Reaction?






