स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत रंगली वेशभूषा स्पर्धा:महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, काश्मिरी वेशभूषांचा समावेश‎

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चित्पावन ब्राह्मण संघाच्या स्थानिक शाखेने विविध वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील पेहरावाचे सादरीकरण हा या स्पर्धेचा उद्देश होता. त्यानुसार या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला. यावेळी मराठी, पंजाबी, राजस्थानी, केरळी, गुजराती, काश्मिरी वेशभूषेचे सादरीकरण करण्यात आले. येथील बडनेरा रोड स्थित समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली होती. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘जयोस्तुते’ या गीताने व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारत माता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाला. या वेळी ‘शतकिरणांनी करू निरंतर नमितो तुजला कलेश्वरा’ या नांदीही सादर करण्यात आली. कार्यक्रमाला चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्रीरंग फाटक तसेच परीक्षक संगीता माथाने, मधुसूदन वटक आणि पूर्वा सोपान गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. छोट्या गटात सहा स्पर्धकांनी वेशभूषा सादर केली. लवकुश-अद्वय सारंग लिमये व अनय सारंग लिमये. सैनिक-युगांश हरीश जडे, श्रीकृष्ण-रिदम गुल्हाने, झाशीची राणी-तीर्था राहुल बलखंडे, भारत माता-आरोही राहुल बलखंडे आणि मदर तेरेसा-निर्वेश गजानन चौधरी यांनी सादर केली. या गटात निर्वेश चौधरीला प्रथम, आरोही बलखंडेला द्वितीय तर रिदम गुल्हाने याला तृतीय क्रमांकाचे बक्षीस दिले. मोठ्या गटात पाच स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर-सर्जेराव गलपट, नेताजी सुभाषचंद्र बोस-अविनाश राजगुरे, गाडगे महाराज-अर्चना वऱ्हाडपांडे, लोकमान्य टिळक-वसंत साठे, तुकडोजी महाराज-वसंत साठे आणि सावित्रीबाई फुले-सुजाता चंद्रशेखर पेंडसे यांनी सादरीकरण केले. यामध्ये वसंत साठे यांना प्रथम क्रमांक, सर्जेराव गलपट यांना द्वितीय क्रमांक तर अर्चना वऱ्हाडपांडे यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. सर्वांना रोख पारितोषिक आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले. यानंतर परीक्षकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संघाच्या सचिव स्वाती परांजपे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्राची मोडक यांनी मानले. प्रारंभी मकरंद जोशी, सीमा करमरकर, सीमा गद्रे यांच्या हस्ते परीक्षकांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सावरकरप्रेमी उपस्थित होते. उपक्रमासाठी चित्पावन ब्राह्मण संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. स्वाती फाटक (गुजराती), अर्चना केळकर (केरळ), प्राची मोडक (बंगाली), अश्विनी शर्मा (पंजाबी), नीलिमा जोशी (मराठी), सोनाली धामणकर (राजस्थानी) आणि भार्गवी वझे (काश्मिरी) यांनी स्पर्धेत वेशभूषा सादर केल्या. या सर्व प्रदेशातील महिलांच्या हस्ते भारत मातेची आरती करण्यात आली. कार्यक्रम स्थळी वंदे मातरम, भारत माता की जय या जयघोषासह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या वेशभूषेत श्रीरंग फाटक यांचे आगमन झाले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या (जयदेव जयदेव जय जय शिवराया) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे समूह गान करण्यात आले आहे. वंदे मातरम, भारतमातेचा निनादला जयघोष

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow