शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा:सौर पंप आणि पांदण रस्त्यासह वयोश्री योजनेतून अपंगांना मिळणार सहाय्यक उपकरणे

१२ तास वीज पुरेल असा सौरपंप, १२ फुटाचा पांदण रस्ता आणि अपंग व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार सहायक उपकरणांचा पुरवठा करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वडाळी स्थित नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात ‘अलीम्को’तर्फे सहाय्यक उपकरणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, चंदू यावलकर व प्रवीण तायडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, गरजू व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकारतर्फे योजना राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी अपंगांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या या पहिल्या टप्प्यात तीन हजार अपंग आढळून आलेले आहेत.या सर्वांना त्यांच्या गरजेनुसार उपकरणे देण्यात येणार आहे. वयोश्री योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आपल्या परिसरातील अपंगांना याबाबत माहिती देण्यात यावी. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात त्यांना लाभ होऊ शकेल. त्यासोबतच महाराजस्व अभियानामध्ये शिबिरे घेऊन याबाबतची माहिती देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात जलसंधारणाचे ही कामे प्राधान्याने हाती घेऊन भुजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पांदण रस्ता आणि पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पांदण रस्त्यासाठी मॉडेल तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात किमान बारा फुटाचा पांदण रस्ता राहणार आहे. यासोबतच सर्व शाळा आदर्श करण्यावर भर देण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने समाजातील सर्व घटकांना मदत करण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार कृत्रिम अवयव वाटप करण्यात येत आहेत. अपंग आणि निराधारांना देण्यात येणारे सहाय्यक अनुदान वाढविण्यात आले आहे. एक पेड माँ के नाम येत्या वर्षात ५ जून ते १५ ऑगस्ट दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने 'एक पेड माँ के नाम' उपक्रमात एक झाड लावून आपल्या आईच्या स्मृती जागवाव्या. यासाठी शासनातर्फे मोफत रोपांचा पुरवठा करण्यात येईल. सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Jun 2, 2025 - 03:43
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow