राज ठाकरेंनाही पत्रिका दिल्याचे समजताच उद्धव ठाकरेंनी घेतला यू-टर्न:शिवसेना नेत्याने दिले होते मुलाच्या लग्नाचे निमंत्रण, मंत्री योगेश कदम यांनी सांगितला किस्सा

नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची बुधवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. बडगुजर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि पक्षातील नाराजीचा सूर लावला होता. त्यांच्या या हालचालींवर लक्ष ठेवून उद्धव ठाकरे यांनी सकाळीच तडकाफडकी बडगुजर यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अन् उद्धव ठाकरेंनी घेतला यू-टर्न या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे नेहमीच सूडाचे राजकारण करत आले आहेत. आम्ही ते लहानपणापासून पाहत आलो आहोत, असे म्हणत त्यांनी एक किस्सा सांगितला. शिवसेनेच्या एका तत्कालीन आमदाराने राज ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली, हे समजताच उद्धवजी रागात भर रस्त्यातून यू-टर्न घेऊन निघून गेले होते. योगेश कदम पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे एखादे कामाचे पत्र देणे चुकीचे कसे? उद्धवजी स्वतः अजित पवार यांना भेटतात, मग कार्यकर्त्यांनी भेट घेतली तर त्यात गैर काय? हीच कारणे आहेत की अनेक कार्यकर्ते आता शिंदे गटात सामील होत आहेत. उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी पक्ष सोडला राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना योगेश कदम म्हणाले, राज ठाकरेंनी पक्ष सोडला, यामागे उद्धव ठाकरेंचाच स्वभाव कारणीभूत आहे. दोघे पुन्हा एकत्र आले तरी महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. यावेळी भरतशेठ गोगावले यांच्या नावाचाही उल्लेख करत कदम म्हणाले, भरतशेठ एक दिलखुलास आणि थेट व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, तेव्हाच त्यांच्या संघर्षाला योग्य न्याय मिळेल. पोलिस अधिकारी सुपेकरांचे चौकशीचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. गुन्ह्यांचा तपास कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाखाली होणार नाही, असे त्यांनी सांगितले. सुपेकर यांची बदली ही तपासाच्या पारदर्शकतेसाठी योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, जर एखाद्या अधिकाऱ्याने चुकीच्या गोष्टींना पाठींबा दिला असेल, तर अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेकडून काश्मीरमधील पहलगाम घटनेनंतर काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. संशयास्पद ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त कारवाईने शोधमोहीम राबवली जात आहे. भारत-पाकिस्तान संदर्भातील अनेक हेरगिरीच्या घटना याआधीही उघडकीस आल्या आहेत. अशा युद्धजन्य किंवा सुरक्षा धोक्याच्या परिस्थितीत कोम्बिंग ऑपरेशनचे महत्त्व अधिक वाढते, असे मंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow