मानसिक ओझे ओळखणारा ई-टॅटू:तणावाच्या व्यवसायात चुका रोखण्यात ठरेल फायदेशीर, आरोग्याकडेही लक्ष ठेवणार
आपला मेंदू किती दबाव झेलत आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टी आपल्याला मानसिकदृष्ट्या थकवतात. आता वैज्ञानिकांनी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ते हा मानसिक दबाव मोजेल. त्याला म्हणतात, ई-टॅटू. हा इलेक्ट्रिक टॅटू कपाळावर चिकटवला जातो. हे हलके, लवचिक आणि वायरलेस उपकरण पायलट, डॉक्टर आणि इतर उच्च दबाव झेलणाऱ्या लोकांसाठी गेमचेंजर ठरू शकते. हे तंत्रज्ञान चुका तर रोखेलच, शिवाय मानसिक आरोग्याचेही रक्षण करेल. टेक्सॉस विद्यापीठाचे डॉ. नंशु लू आणि त्यांच्या टीमने हे क्रांतीकारक उपकरण विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे की, कोणत्याही एक्सपर्टशिवाय आपण ते वापरू शकतो. त्याची किंमत आहे, १७ हजार रुपये. रियूजेबल असल्याने हा ई-टॅटू व्यापक रुपाने वापरता येणे सहजशक्य आहे. हे पारंपारिक ईईजी आणि ईओजी उपकरणांच्या तुलनेत जास्त सुविधाजनक, अचूक आहे. उच्च जोखमीच्या व्यवसायात भूमिका : पायलट, सर्जन वा आपत्कालीन विभागात काम करणाऱ्या लोकांच्या मानसिक थकव्याचे नियमन होणे गरजेचे. एक लहानशी चूकही जीवावर बेतू शकते. ई-टॅटू या समस्येचे निराकरण करते. हे उपकरण क्रियांचे मॉनिटर करते. त्यातून त्यावेळच्या मानसिक दबावाचे आकलन होते. उदा. समजा, एक पायलट उड्डाणादरम्यान प्रचंड तणावात असेल तर तो ई-टॅटू सावधगिरीचा इशारा देतो. त्यामुळे पायलटला दुसऱ्याला मदत मागता येते. डॉ. नंशु यांच्यानुसार, हे तंत्रज्ञान चुका तर रोखतेच शिवाय मानसिक आरोग्याचे रक्षणही करते. दीर्घकाळ मानसिक दबावामुळे तणाव, थकवा आणि बर्नआऊटसारख्या समस्या उद्भवू शकतात. ई-टॅटू हा धोका कमी करतो. हे तंत्रज्ञान दबाव झेलणाऱ्या नोकरदार, व्यावसायिकांसह सर्वसामान्य लोकांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करते. संशोधक ते आणखी स्मार्ट होण्याच्या दिशेने काम करत आहेत. त्यातून हे उपकरण डाटाचे विश्लेषण करून स्मार्टफोन ॲपच्या माध्यमातून थेट वापरकर्त्याला इशारा देऊ शकेल. सध्या हा ई टॅटू फक्त केस नसलेल्या त्वचेवरच काम करतो. त्याला शरीराच्या अन्य भागात लावण्यासाठी संशोधन सुरू आहे. लवकरच त्यात यश येण्याची आशा आहे. इलेक्ट्रोड मेंदू व डोळ्यांच्या हालचाली योग्यरीत्या ट्रॅक करून देते अचूक माहिती ई-टॅटू एक अत्याधुनिक उपकरण आहे. जे ग्रेफाइटने बनले आहे. त्याला कपाळावर एका विशिष्ट चिकटणाऱ्या पेपरद्वारे लावले जाते. त्यात चार इलेक्ट्रोड मेंदूच्या हालचाली, क्रिया टिपतात. डोळ्यांच्या जवळपास लावलेले आयताकार इलेक्ट्रोड डोळ्यांच्या हालचाली ट्रॅक करतात. एक इलेक्ट्रोड कानाच्या मागे लावलेला असतो. हे सर्व इलेक्ट्रोड एकमेकांशी जोडलेले असतात. ते अचूक मोजमाप करतात.हे उपकरण एक सर्किट आणि हलक्या बॅटरीशी जोडलेले असते. त्याला सहजपणे काढता वा लावता येते. ई-टॅटू अतिशय हलका आणि आरामदायक असतो.

What's Your Reaction?






