मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहिता:हुंडा, प्री-वेडिंगला विरोध, कर्ज काढून लग्न न करण्याचे आवाहन; वैष्णवी प्रकरणानंतर निर्णय
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेनंतर समाजमन हादरले असून, तिच्या मृत्यूने केवळ तिच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख केले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर लग्नातील हुंडा, मानपान आणि शाही सोहळ्यांच्या प्रथांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने एक अत्यंत स्वागतार्ह आणि पुरोगामी पाऊल उचलत मोठा निर्णय घेत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. अहिल्यानगरमध्ये नुकतीच मराठा समाजाच्या विचारमंचाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समाजातील हुंडा आणि बडेजावाच्या विवाह प्रथांविरोधात ठोस निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एक आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार विवाह साध्या पद्धतीने पार पाडावा, हुंडा किंवा मानपान घेणे-देणे टाळावे, विवाह सोहळा विनाखर्ची व सुसंस्कृत ठेवावा यांसह प्री-वेडिंग शूट आणि अनावश्यक खर्च न करण्याचे नियम या आचारसंहितेत करण्यात आले आहे. आचारसंहिता पालन करणाऱ्यांचा होणार सत्कार विशेष म्हणजे ही आचारसंहिता फक्त भाषणापुरती न राहता प्रत्यक्षात उतरावी, यासाठी 11 सदस्यांची सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणार आहे. या आचारसंहितेचे पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे सत्कार देखील करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या लग्न समारंभासाठी आचारसंहिता खालीलप्रमाणे...

What's Your Reaction?






