हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाने सतर्क रहावे:जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक

राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता 4 दिले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर मुंगल, डॉक्टर भालेराव यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये कोविडच्या काळात जास्तीत जास्त किती रुग्ण होते याची माहिती घेतली. डेडिकेटेड कोविड केअर सेंटर किती ठिकाणी उभारण्यात आले होते, जास्तीत जास्त किती रुग्णांवर उपचार करण्यात आले याचा आढावा घेतला. तसेच किती कोविड संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली याची माहिती ही त्यांनी घेतली. हिंगोली जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढल्यास तातडीने काय उपाययोजना करू शकतो याची माहिती ही त्यांनी यावेळी घेतली. जिल्ह्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी दिले. कोविड रुग्ण आढळून आल्यास आरोग्य विभागाने आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत . कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी दिली

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow