मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे सेना वाद:मोठा भाऊ कोण हे निवडणुकीत ठरेल; संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. भाजप आणि शिंदे सेना यांच्यात मोठा भाऊ कोण याबाबत चाललेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. शिरसाट यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात पक्ष सर्वेक्षण करतात आणि फीडबॅक घेतात. विधानसभा निवडणुकीत झालेल्या सर्वेक्षणांपैकी 80 टक्के सर्वेक्षणे चुकीची ठरली होती. त्यामुळे अशा अंदाजांवर राजकीय गणित बांधणे योग्य नाही. संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, सध्या कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ हे ठरलेले नाही. हा निर्णय निवडणुकीच्या वेळी होईल. उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, त्यानंतरच सर्वेक्षणाला महत्त्व येईल. सध्याचे सर्वेक्षण प्राथमिक स्वरूपाचे असून यानंतर आणखी दोन सर्वेक्षणे होणार आहेत. मुंबईवर भगवा फडकवणार चंद्रहार पाटील यांच्या शिंदे सेनेत होणाऱ्या प्रवेशाबाबत बोलताना शिरसाट यांनी उद्धव सेनेवर टीका केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने काही फरक पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेवटी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र येतीलच असे नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत विचारले असता, शिरसाट म्हणाले, ही केवळ शक्यता आहे. सर्व्हेमधून अशा चर्चा पुढे येतात, पण या गोष्टी घडतीलच असे गृहित धरू नये. आपण कोणासोबत आहोत किंवा नाही, हे पक्ष ठरवेलच. मात्र, आपला भगवा मुंबई महापालिकेवर फडकला पाहिजे, हा आमचा स्पष्ट विश्वास आहे. शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीच्या चर्चांवर बोलताना संजय शिरसाट यांनी कालची बैठक पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि संघटनात्मक बाबींवर असल्याचे सांगितले. काम करताना काय अडचणी येतात, याबाबत आमदारांनी सांगितले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे की, कुठेही वाच्यता करू नका. तिन्ही नेते मिळून मार्ग काढू असे म्हटले आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow