जळगावात दोन भीषण अपघात:पहिल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू; मुक्ताईनगरमध्ये खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक

जळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. शहरातील जुना निमखेडी रोडवर पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन सख्खे भाऊ, ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने शिवदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृतांपैकी ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेनेच्या जळगाव शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती असून, प्रमोद शिवदे हे त्यांचे दीर होते. दोघेही पहाटे चारच्या सुमारास आपल्या पाणीपुरी व्यवसायासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी रिक्षाने निघाले होते. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांपैकी एका डंपरने धडक दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महानगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही कर्ते पुरुष गमावल्याने ज्योती शिवदे यांचा आक्रोश हृदयद्रावक ठरला. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुक्ताईनगर येथे खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात राज्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. यात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर 15 ते 20 जण जखमी झाले. आज सकाळी जळगावहून अकोल्याकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला, तर दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातामूळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातग्रस्त गाड्या हटवण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow