बियाणे कंपनीकडून भंडाऱ्यातील शेतकऱ्यांची फसवणूक:100 दिवसात निघणारा धान 125 दिवस होऊन देखील निघाला नाही, ग्राहक मंचात तक्रार

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मांगली (चौ.) येथील शेतकऱ्यांची आसगाव येथील बियाणे कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीने 100 दिवसात निघणारा धानाचा बियाण दिले, मात्र 125 दिवस होऊन देखील धान निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. मिळालेल्या माहितीनुसार पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामा करता आसगाव येथील गुरुदेव कृषी केंद्रातून केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड नावाचे बियाणे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून खरेदी केला. मात्र हा धान शंभर दिवसांमध्ये निघणार असल्याचा कृषी केंद्र चालकांनी सांगितले. शेतकऱ्यांनी त्याची लागवड देखील केली. मात्र आता 125 दिवस होऊन देखील हा धान निघाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात येतात शेतकऱ्यांनी कंपनीला याची माहिती दिली. मात्र कंपनीने शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला देण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी हतबल शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागात केली असून कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा अहवाल दिलेला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने आता शेतकरी ग्राहक मंचामध्ये गेले असून रब्बी व खरीप हंगामाचा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कंपनीकडून फसवणूक- भुरे आमची धान बियाणे कंपनीने फसवणूक केली आहे. यासंदर्भात आम्ही कंपनीकडे गेलो मात्र तुमच्याने जे बनते ते तुम्ही करून घ्या, आम्ही भरपाई देणार नाही असे कंपनीने सांगितले - नीलेश भुरे, शेतकरी, वलनी. कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली- वैद्य श्री गुरुदेव कृषी केंद्र आडगाव येथून के एस गोल्ड हे धनाचे बियाणे घेतले परंतु सदर बियाणे 130 दिवस होणे निसवायचे आहेत याची आम्ही तालुकास्तरावर कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून असल्या प्रकारामुळे आमची रब्बी आणि खरीप ज्ञान लावणी वांद्यात आलेली आहे - कुलदीप वैद्य, शेतकरी, मांगली.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow