गिरीश महाजन फडणवीसांचा सर्वात भ्रष्ट मंत्री:संजय राऊतांचा आरोप; महाजन यांच्या कार्यालयातील अभिषेक कौल नामक व्यक्तीचे घेतले नाव
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा खळबळजनक आरोप केला. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार, बिल्डर आहे. तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकाही फाईलवर सही करत नाहीत, असे त्यांनी म्हटेल आहे. संजय राऊत यांच्या या आरोपामुळे महायुती सरकारमध्ये एकच खळबळ माजली असून, अभिषेक कौल कोण? असा सवाल केला जात आहे. संजय राऊत बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. मी म्हणजेच पक्ष असा अहंकार जेव्हा माणसात निर्माण होतो, तेव्हा त्या माणसाच्या अधःपतनाला सुरूवात होते. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाराज होते. ते आज जिथे आहेत तिथेही फार खूश नाहीत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, असे ते म्हणाले. पक्ष फोडणे हाच भाजप, शिंदेंचा अजेंडा ते पुढे म्हणाले, भाजप व शिंदे गटाच्या लोकांचा पक्ष फोडणे हा एकमेव अजेंडा आहे. हे लोक आपापल्या मंत्रालयातील काम करत आहेत का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. त्यांना मोठ्या मिन्नतवाऱ्या करून यावेळी मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यांना मंत्री करण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण, यांच्या भ्रष्टाचार व इतर प्रकरणाच्या गोष्टी तिथपर्यंत गेल्या होत्या. गिरीश महाजन यांच्या कार्यालयातील अभिषेक कौल कोण? गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार, बिल्डर आहे. तो गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एकही फाईल मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सर्व व्यवहार करतो. त्याच्याकडे पैसे जमा करावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन हा विषय सर्वसामान्य माणसांच्या संबंधित खाते आहे. 350 फाईल महाजन यांच्या मंत्रालयात पडून आहेत. या सर्व फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. हे सर्व व्यवहार कौल करत आहे. महाजन यांनी त्यासाठीच त्याची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे याची माहिती मागावी. त्यांना ती मी देईल. पण ते यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत हे मला माहिती आहे. पण या राज्याला कळले पाहिजे की, या राज्याला काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याभोवती जे साधूसंतांचे महामंडळ गोळा गेले आहे, त्यातील एक साधूसंत हे गिरीश महाजन आहेत. त्यांची लायकी ही आहे, असे ते म्हणाले. महाजनांनी ईडी पीडित साधूसंतांच्या पाया पडावे संजय राऊत म्हणाले, कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने काल गिरीश महाजन अनेक साधूसंतांच्या पाया पडत होते. पण त्यांनी त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे व प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ईडी पीडित साधूसंतांच्या पाया पडले पाहिजे. या सर्वांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. अन्यथा त्यांची तपश्चर्या कधीच पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. मी पुढील काही सांगत नाही. पण अभिषेक कौल यांच्या मंजुरीशिवाय किंवा त्याने एखाद्या फाईलचा व्यवहार पूर्ण केल्याशिवाय महाजन त्या फाईलवर सही करत नाहीत, ही सर्वसामान्य माणसांचे जीवन व भविष्याचा संबंध येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन खात्याची परिस्थिती आहे. गिरीश महाजन यांचे दलाल मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करून घेतात. अशा व्यक्तीने पक्षफोडीच्या गोष्टी कराव्यात यात सगळे आले, असे संजय राऊत म्हणाले. फडणवीस काय भ्रष्टाचारावर बोलतात? संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता भ्रष्टाचार नियंत्रणाचे कोणतेही काम उरले नाही. त्यांच्याकडे अँटी करप्शन आहे. पोलिस खाते आहे. पण अंदाज समितीच्या पीएंनीच भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे फडणवीस काय भ्रष्टाचारावर बोलतात? अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात 15 कोटी रुपये जमा झाले. आता फडणवीस यांनी खोटे बोलू नये. या सरकारची प्रत्येक फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही. गिरीश महाजन यांच्या 350 फाईल्सचा हिशोब आम्ही देणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्या तोतरे बोलण्याचीही नक्कल केली. मदर डेअरीची जमीन अदानींच्या घशात फडणवीस सरकारने काल धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता दिली. संजय राऊत यांनी यावरही टीका केली. हे सरकार मदर डेअरीची 17 एकर जमीन धारावीच्या नावाखाली अदानीच्या घशात घालत आहे, असे ते म्हणाले. सरसंघचालकांना पाठवणार नरकातला स्वर्ग संजय राऊत यांनी यावेळी आपले नरकातला स्वर्ग हे पुस्तक सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठवणार असल्याचेही सांगितले. मी नरकातला स्वर्ग हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठवणार आहे. मोहन भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. त्यांच्या स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने जे सरकार सत्तेत आणले, त्या लोकांनी देशाचा कसा नरक केला, हे त्यांना कळायला हवे. या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा कसा गळा घोटला आहे. हे या पुस्तकातून सरसंघचालकांना समजेल, असे ते म्हणाले. शरद पवारांची इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी संजय राऊत यांनी यावेळी शरद पवारांनी इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला मारलेल्या दांडीवरही भाष्य केले. दिल्लीत बैठक इंडिया आघाडीची नव्हती. इंडिया आघाडीची बैठक असती तर उद्धव ठाकरे असते, स्वतः शरद पवार असते, अखिलेश यादव असते, लालू यादव असते, ममता बॅनर्जी असत्या, सगळे प्रमुख नेते असते. विशेष अधिवेशन संदर्भात एक ड्राफ्ट तयार करायचा होता, त्यासाठी आम्ही चार ते पाच लोक बसलो होतो. इंडिय

What's Your Reaction?






