ओबीसी निधीवर खुलासा आवश्यक:हाके बोलत असलेल्या मुद्यांवर तातडीने बैठक घ्या, आमदार पडळकरांचा अजित पवारांना सल्ला

ओबीसी आरक्षण आणि निधीवाटपाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आरोपांवर राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेऊन खुलासा करावा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, हाके यांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर खुली चर्चा व्हावी. जर ओबीसी समाजाचा निधी अडवण्यात आला असेल, तर तो उघड केला जावा. आणि तसे काही नसेल, तर अजित पवारांनी स्पष्ट उत्तर द्यावे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व ओबीसी नेत्यानीही उपस्थित रहावे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, कोणी प्रश्न विचारत असेल, तर त्याला उत्तर दिले पाहिजे. माझ्यावर कोणी आरोप केला, तरी मी त्याला पुराव्यानिशी उत्तर देतो. जर ओबीसींचा निधी अडवलेला नाही, असे राष्ट्रवादीचे म्हणणे असेल, तर त्यांनी अधिकृतपणे स्पष्टीकरण द्यावे. राज्यातील जनतेच्या मनात जर शंका निर्माण झाली असेल, तर तिचे निरसन करणे हे संबंधित खात्याचे कर्तव्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून हाके यांच्यावर सुरू असलेल्या टीकेवर पडळकरांनी प्रतिक्रिया दिली. नेमके प्रकरण काय? ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना विचारले होते की, अजित पवार यांना ओबीसींसाठी निधी वाटताना हाताला लकवा का येतो? तसेच, ते नेहमीच भाजपचे नेते अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या टीकेनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अमोल मिटकरी नेमके काय म्हणाले होते? लक्ष्मण हाके हा भुंकणारा कुत्रा आहे. त्यांना जास्त किंमत दिली नाही पाहिजे, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला. ते महादेव जाणकर यांचे उपकार विसरले आहेत. त्यांच्यासोबत राहून हाके यांनी जानकर यांना दगा दिला, असा आरोपही मिटकरी यांनी हाकेंवर केला. ते काय ओबीसी समाजाबद्दल बोलत आहे. सरकारने ओबीसी समाजासाठी किती काम केले आहे, याची त्यांना कल्पना नाही. त्यांची लायकी नाही, अशी टोकाची टीकाही मिटकरी यांनी हाकेंवर केली. हाकेंचा मिटकरींच्या टीकेवर जोरदार पलटवार लक्ष्मण हाके यांनी देखील अमोल मिटकीर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जोपर्यंत मिटकरी वायझेड शब्दाचा अर्थ सांगणार नाहीत, तोपर्यंत मी अजित पवार यांचे कपडे फाडायचे सोडणार नाही, असा इशारा हाके यांनी दिला. मी ओबीसींचे प्रश्न विचारतोय. अजित पवार यांनी यांच्या आमदाराला कमरेखालच्या शिव्या द्यायला ठेवले. अमोल मिटकरी जेवढी माझ्यावर टीका करतील तेवढे मी अजित पवारांना जास्त प्रश्न विचारणार आहे, असेही हाके म्हणाले.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow