केबल टाकताना विजेचा खांब कोसळला; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू:हिंगोलीच्या हिवरा शिवारातील घटना
वसमत तालुक्यातील हिवरा शिवारात विजेच्या खांबावर केबल टाकत असतांना खांब तुडून पडल्याने एका कामागाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वमसत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 3 रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वाखारी व परिसरातील काही तरुण विजेचा खांब उभे करणे, केबल वायर टाकणे, विज वाहिन्या टाकण्याचे काम करतात. कंत्राटदाराच्या सोबत हे तरूण काम करीत असून मंगळवारी ता. 3 दुपारी हिवरा शिवारात काम सुरु होते. या ठिकाणी विज वाहिन्या बदलून त्या ठिकाणी केबल टाकण्याचे काम केले जात होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास करण सुरेश गवंदे (26, रा. वाखारी) हा सिमेंटच्या खांबावर केबल टाकण्यासाठी खांबावर चढता होता. केबल बसवित असतांना अचानक खांब तुटला असून करण खांबासह खाली पडला. यावेळी खांबाचा तुकडा त्याच्या छातीत घुसऱ्याने तो गंभीर जखमी झाला. त्या ठिकाणी काम करणाऱ्या इतर कामगारांनी त्याला तातडीने उपचारासाठी खाजगी वाहनाने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजय उपरे, विनायक जानकर, अविनाश राठोड, नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी दिलीप गवंदे यांच्या माहितीवरून वमसत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारीता. 3 रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार विजय उपरे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, मयत करण हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गवंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

What's Your Reaction?






