पुरेसा जलसाठा असतानाही "तांत्रिक कारणां'मुळे पाणीटंचाईची स्थिती:नागरिक त्रस्त, आजपासून पुरवठा सुरळीत होणार असल्याचा मनपाचा दावा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात सध्या १६.८८ टक्के जलसाठा असूनही नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जुनाट पाइपलाइन, गळती, नियोजनशून्य वितरण आणि दुर्लक्ष व तांत्रिक कारणांमुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. विशेषतः हद्दवाढ भाग, कौलखेड परिसर आणि निचऱ्याच्या भागांमध्ये दूषित पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सद्यःस्थितीत काटेपूर्णा धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत १ टक्का पाणीसाठा शिल्लक आहे, जो शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पुरेसा आहे. तरीदेखील नळांमधून नियमित व शुद्ध पाणी मिळत नाही, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, काही वेळा तोही दिवस पुढे ढकलण्यात येतो. अकोला शहराला मुबलक जलसाठा असूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल, तर ही शुद्ध प्रशासनिक अपयशाची झलक आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांचा आंदोलनांच्या रुपाने विरोध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित पान ४ प्रतिनिधी |अकोला संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. दोन दिवसाच्या प्रवासानंतर "श्रीं'चा पालखी सोहळा बुधवारी सकाळी अकोल्यात दाखल होणार आहे. भाविकांमध्ये माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली असून ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. भौरद येथे मुक्कामी असलेली पालखी सकाळी ९ वाजता खंडेलवाल महाविद्यालयात पोहोचणार आहे. यानंतर दोन दिवस राजराजेश्वर नगरीत फक्त "माऊली'चा गजर ऐकू येणार आहे. यंदा पालखीचे ५६ वे वर्ष आहे. पालखीचा पहिल्या दिवशीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या प्रांगणात राहिल. त्यापूर्वी दिवसभर भक्त उर्वरित पान ४ अमोल डोईफोडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जुनाट पाइपलाइनमुळे पाणीपुरवठा अडचणीत शहरात काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाइप जीर्ण झाले असून अनेक ठिकाणी फुटले आहेत. विशेषतः निचऱ्याच्या भागांमध्ये गटाराच्या जवळून ही पाइपलाइन गेल्याने त्या ठिकाणी गटारांचे पाणी नळांमधून घरात येते. कौलखेड परिसर, हिंगणा फाटा, आनंद नगर, स्कूल ऑफ स्कॉलरचा परिसरात पाण्याला दुर्गंधी येते, अशी तक्रार नागरिक करत आहेत. पावसाळ्याची सुरुवात, दूषीत पाणी टाळा; उकळून प्या सध्या पावसाला सुरुवात झाली असून, अशा काळात दूषित पाण्यामुळे रोगांची साथ फैलावण्याची शक्यता वाढते. नागरिकांनी पाणी उकळूनच प्यावे, असा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. प्रशासनाने देखील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी व क्लोरिनेशन प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवण्याची गरज आहे.

What's Your Reaction?






