डाक सेवेत खंड:रक्षाबंधनाच्या काळात अमरावती जिल्ह्यातील निम्मी पोस्ट ऑफिसेस शनिवारी बंद

अमरावती जिल्ह्यातील निम्म्या भागात शनिवारी, २ ऑगस्ट रोजी पोस्ट ऑफिसेस बंद राहणार आहेत. नवीन अॅडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी (एपीटी) इन्स्टॉल करण्यासाठी ही आपत्कालीन सुटी घेण्यात आली आहे. अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव, चांदूरबाजार आणि मेळघाटमधील धारणी व चिखलदरा तालुक्यातील सर्व पोस्ट ऑफिसेस बंद राहतील. रक्षाबंधनाची धामधूम सुरू असताना ही सुटी जाहीर झाल्याने बहिणींना राख्या पाठविण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. शनिवारनंतर रविवारची नियमित सुटी असल्याने नागरिकांना सलग दोन दिवस या सेवेपासून वंचित रहावे लागणार आहे. टपाल खात्याने देशभरात अॅडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी (एपीटी) ही प्रणाली टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्याचे ठरवले आहे. अमरावती विभागातील अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी आणि वरुड या तालुक्यांमध्ये २२ जुलैला ही प्रणाली इन्स्टॉल करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण ४१४ शाखा कार्यालये, ५३ उप डाकघर आणि अमरावती व परतवाडा येथे दोन मुख्य डाकघरे आहेत. यापैकी अमरावतीचे मुख्य डाकघर, ३३ उपडाकघर आणि २३६ शाखा कार्यालयांमध्ये ही प्रणाली आधीच इन्स्टॉल झाली आहे. परतवाडा विभागाशी संबंधित उर्वरित १९७ कार्यालयांमध्ये ती २ ऑगस्ट रोजी इन्स्टॉल केली जाईल. उप डाक अधीक्षक पांडुरंग गेडाम यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी बंद राहणाऱ्या कार्यालयांमध्ये परतवाडा येथील एक मुख्य डाकघर, २० उपडाकघरे आणि १७८ शाखा कार्यालयांचा समावेश आहे. रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, बचत खाते, विमा, पारपत्र, आधार अपडेशन यांसारख्या सर्व सेवा या दिवशी उपलब्ध होणार नाहीत.

Aug 1, 2025 - 02:57
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow