ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे राष्ट्रीय स्मारक करणार:नगरप्रेमी नागरिकांचा संकल्प,अहिल्यानगर शहर स्थापना दिनी रसिक ग्रुपचा अनोखा उपक्रम‎

भरपूर पाऊस पडून गेल्याने हिरवाळच्या निसर्गरम्य व प्रसन्न वातावरणात शहरातील भुईकोट किल्ल्याच्या झुलत्या पुला जवळ एक पणती प्रज्वलित होते. काही ध्येयवेडे नगरप्रेमी काट्याकुट्यातून, चिखलातून मार्ग काढत किल्ल्याचे पूजन करतात व ‘उधळीत शतकीरणा उजळीत जनहृदया...’ या स्फूर्ती गीताच्या पंक्ती म्हणत भविष्यात हा किल्ला राष्ट्रीय स्मारक करण्याचा संकल्प केला. नगरचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या रसिक ग्रुपच्या वतीने शहराच्या स्थापना दिनानिमित्त ऐतिहासिक भुईकोट किल्यातील झुलत्या पूला जवळ ‘पर्यटन नगरी अहिल्यानगर’ असा फलक लाऊन व किल्ल्याचे पूजन करून अनोख्या पद्धतीने शहराचा स्थापना दिन साजरा केला. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमास नगरप्रेमी नागरिक उपस्थित होते. येलुलकर म्हणाले, पंचशताब्दी वर्षांचा गौरवशाली व ऐतिहासिक वारसा लाभलेले आपले शहर आता अहिल्यादेवींच्या नावाने ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे या शहराला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्याई लाभणार आहे. स्थापना दिनानिमित्त ज्यांनी हे शहर वसवले, ज्यांनी शहर सांभाळले व ज्यांनी शहराचा विकास केला त्यांच्याप्रती रसिक ग्रुप कृतज्ञता व्यक्त करत आहे. आज शहर वाढत आहे, विकसित होत आहे पण दुर्दैवाने शहराचा पर्यटन विकास खुंटला आहे. शहरात असलेल्या ऐतिहासिक स्थळांमुळे हे शहर देशातील पहिल्या १० शहरांमध्ये येऊ शकते पण सर्वांच्या उदानसीते मुळे हे होऊ शकले नाही. देशात प्रसिद्ध असलेला भुईकोट किल्ल्याकडेही दुर्लक्ष होत आहे. बुरुजांवर वाढणाऱ्या झाडांमुळे काही दिवसांनी बुरुज ढासळून हा खंदक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा किल्ला जपण्यासाठी व विकासासाठी याचे राष्ट्रीय स्मारक होणे गरजेचे आहे. यावेळी इतिहास संशोधक डॉ.प्रा.नवनाथ वाव्हळ यांनी शहराच्या वैभवशाली इतिहास थोडक्यात सांगितला. शैलेश राजगुरू यांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांचे सोशल मिडीया द्वारे प्रसिद्धी करा, असे सांगितले. स्नेहल उपाध्ये यांनी उधळीत शतकीरणा हे गीत सदर केले. यावेळी उद्योजक विकास सांगळे, महावीर गोसावी, रेणावीकर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, जालिंदर बोरुडे, ज्येष्ठ कवी ल. धो. खराडे, दिनानाथ देशमाने, शैलेश राजगुरू, प्राजक्ता डफळ आदी उपस्थित होते. रसिक ग्रुपच्या दिपाली देऊतकर यांनी स्वागत केले. निखील डफळ यांनी प्रास्ताविक केले.

Jun 1, 2025 - 03:02
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow