बाबासाहेबांची चळवळ समजण्यासाठी प्रत्येक उपासकाने पुढे यावे- वानखडे:त्रिरत्न बुद्ध विहार गुडधी महानगर अकोला पूर्व येथे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळ उपासक-उपासिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक उपासकाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा अकोला महानगर पूर्वचे अध्यक्ष गोरखनाथ वानखडे यांनी केले. गुडधी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. त्रिरत्न बुद्ध विहार गुडधी महानगर अकोला पूर्व येथे वर्षवासानिमित्त प्रवचन संपन्न झाले. सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखेडे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी पुष्प अर्पण करण्यात आले व धम्मदीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा सुरुवात करण्यात आली. यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक रमेश गवई, जिल्हा महिला सरचिटणीस प्रज्ञा इंगळे, माजी उपाध्यक्ष संस्कार विभाग प्रमुख तथा केंद्रीय शिक्षक भाऊसाहेब थोरात, भारतीय बौद्ध महासभा अकोला महानगर पूर्वचे सरचिटणीस संतोष रायबोले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या प्रतिमेला तसेच पंचशील ध्वजाला पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा महानगर अकोला पूर्वचे संघटक गोकुळ गोपनारायण व मधुकर लबडे, अकोला पूर्वचे उपाध्यक्ष मधुकर दामले, सचिव प्रचार व प्रसार विभाग प्रमुख तथा बोधाचार्य डॉ. ज्ञा. वा. गवई आदी उपस्थित होते. संतोष रायबोले, रमेश गवई यांनी मनोगत व्यक्त केले. त्रिशरण पंचशील घेऊन वर्षवासानिमित्त त्रिरत्न बुद्ध विहार गुडधी येथे आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत डॉ. धनंजय किर लिखित "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र' या ग्रंथाचे वाचन व स्पष्टीकरणासहित समजावून सांगण्याचे कार्य ग्रंथवाचक गौतम उके त्यांच्या वाणीतून व त्यांचे सहकारी मधुकर दामले, दादू इंगळे, भीमराव सदाशिव, गौतम सुरवाडे यांच्या वतीने झाले. कार्यक्रमाला त्रिरत्न बुद्ध विहारांमध्ये ६० उपासिका आणि ३० उपासक उपस्थित होते. सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा गुडधीचे अध्यक्ष दादू इंगळे, आभार प्रदर्शन बोधाचार्य मधुकर दामले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुडधी गावातील श्रद्धावान बौद्ध उपासक व उपासिका यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. शेवटी सरनत्त्तय घेण्यात आले, अशी माहिती अकोला महानगर पूर्वचे सचिव प्रचार व प्रसार विभाग प्रमुख डॉ. ज्ञा. वा. गवई यांनी एका पत्रकाद्वारे दिली. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीला भक्कम करा प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी. जे. वानखेडे यांनी धम्मदेशना दिली. त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था आहे. म्हणून या मातृसंस्थेचा भरभराटीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे आणि फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला अधिकाधिक भक्कम करावे, असे आवाहन केले.

What's Your Reaction?






