रडत-खडत चालणाऱ्या एसटी बसच्या रेखरेखीसाठी दक्षता समितीची शिफारस:दहिगाव सिंचन योजनेची पाणी उपसा पातळी 490 वरून 485 मीटर करण्याचा ठराव

करमाळा मोठ्या संख्येने पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या विरोधात तक्रारी असताना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने तसेच ग्रामीण पाणीपुरवठ्याची अधिकारी उपस्थित असताना ते बेजबाबदारपणे उत्तरे दिल्याने दोघांवरही कार्यवाही करण्याच्या सूचना आमसभेत देण्यात आल्या. याशिवाय एसटी महामंडळावरील देखरेखीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय करमाळा मतदारसंघाच्या आमसभेत घेण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. ३०) झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायण पाटील होते. या वेळी महसूलमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार घरकुलासाठी वाळू देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पुढाकार घेण्यात आला. त्याची सुरुवात पाच वृद्ध व दिव्यांगांना वाळू देऊन करण्यात आली. सदर बैठकीनिमित्त आमसभेचे आयोजक व सचिव म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी काम पाहिले. तर तालुक्याच्या प्रमुख म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे व गहिनीनाथ ननवरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सवितादेवी राजेभोसले, संतोष वारे, आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. सदरची सभा सकाळी साडेअकरा ते पाच वाजेपर्यंत सुरू होती. सायंकाळी आटोपती घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आमसभेच्या निमित्ताने महिनाभरापूर्वी सर्व विभागातील प्रश्नांबाबत नागरिकांकडून प्रश्न मागवण्यात आले होते. यावेळी सदरच्या प्रश्नांवर उत्तरे देण्यासाठी संबंधित विभागांना प्रश्न पाठवण्यात आले होते. या वेळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधिकारी उपलब्ध नसल्याने शिवाय त्या विभागाचे अधिक प्रश्न असल्याने उपस्थित नागरिकांसह शिवसेनेचे शाहू फरतडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी विनंती केल्यानंतर सचिव कदम यांनी कारवाईचे आश्वासन दिले. करंजे गावातील सभागृह चोरीला गेल्याची तक्रार या वेळी मनसेचे अध्यक्ष संजय घोलप यांनी सौर ऊर्जा, कुणबी प्रमाणपत्र व इतर प्रश्नाकडे लक्ष वेधले. तर भाजपच्या शशिकांत पवार यांनी करंजे गावातील सभागृह चोरीला गेलेले सांगून त्याकडे लक्ष वेधले. सुनील सावंत यांनी शहरातील अधिकाऱ्यांच्या कामाकडे लक्ष वेधले. ॲड. राहुल सावंत यांनी करमाळा ग्रामीणच्या अडचणी मांडल्या. अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार मागील वेळी पाणी आढावा बैठकीत पाणीपुरवठ्यासंदर्भात आयोजित बैठकीत अनेक प्रश्नांचा भडीमार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता. त्यामध्ये संतोष वारे व ॲड. राहुल सावंत यांनी मुद्दे उपस्थित केले. या वेळी काही मुदत मागून पुढील कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु आमसभेपर्यंत अद्यापही योग्य उत्तरे देता न आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही संबंधितांची तक्रार केली. त्यावर वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊन निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार पाटील व उपस्थित नागरिकांनी केली. यासह जलजीवन मिशनच्या तळेकर नामक ठेकेदारावर ब्लॅक लिस्ट करण्याची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील पूर्व भागाची वरदायिनी दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली असून, २२ गावांतील १०,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. परंतु उजनी येथील पंपगृहाची पाणी उचलण्याची पातळी ४९० मीटर उंचीची आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही. भीमा-सीना बोगदा ४८८.२० मीटर, मराठवाड्यासाठी जाण्यासाठी योजनेची ४८७ मीटर आहे. सदर योजनेची पाणी उचलण्याची पातळी दहिगाव उपसा सिंचन योजनेपेक्षाखाली असल्याने दहिगाव योजना लवकर बंद होते. तरी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी उचलण्याची पातळी उंची ४८५ मीटर करावी, असा ठराव आमसभेत आमदार पाटील यांच्या वतीने घेण्यात आला.

Jun 1, 2025 - 03:02
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow