अहिल्यादेवींचा दूरदर्शीपणा; पालखी मार्गावर भक्तांसाठी बारव:पंढरपूर तालुक्यात अहिल्यादेवींच्या कार्य अन् कर्तृत्वाच्या खुणा, बोहाळीत दिली जमीनदान
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाच्या खुणा पंढरपूर तालुक्यात आजही दिसतात. पालखी महामार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बारव बांधला. बोहाळीत राम मंदिर बांधण्यात आले. दीडशे एकर जमीनही दान देण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती शनिवारी (दि. ३१) साजरी होत आहे. अहिल्यादेवींनी आपल्या दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि लोकहितवादी कार्याचा ठसा उमटवला आहे. दक्षिण काशी पंढरीत अहिल्यादेवींचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यांनी बांधलेला होळकरवाडा, त्यातील रामाचे मंदिर आजही भाविकांचे श्रद्धास्थान आणि आश्रयस्थान आहे. पंढरीला येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी १७ व्या शतकात बोहाळी (ता. पंढरपूर) येथे एक विहीर बांधली आहे. विशेष म्हणजे, आजही याच विहिरीद्वारे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याशिवाय याच विहिरीवरून शेतीला पाणीपुरवठा केला जात होता. अलीकडच्या काळात या विहिरीचे नाव अहिल्यादेवी होळकर असे ठेवण्यात आले. विहिरीच्या बाजूलाच त्यांनीच बांधलेले श्रीरामाचे मंदिर आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी बोहाळी गावातच मंदिराच्या पुजाऱ्यांची नेमणूक करून मंदिराच्या व्यवस्थेसाठी, तसेच परिसरातील पशू, पक्ष्यांच्या व्यवस्थेसाठी या जमिनीचा उपयोग करण्याचे आदेश पुजाऱ्यांना दिले होते. यामध्ये सुमारे २५ एकर जमिनीवर पिकवलेले धान्य पशू आणि पक्ष्यांसाठी सोडावे, त्याचा वापर त्याचकारिता व्हावा, अशी सूचनाही त्यांनी केल्याचे सांगितले जाते. वाखरी येथील बाजीराव पेशव्यांच्या स्मरणार्थ बांधलेली विहीर १११ फूट लांब, १८ फूट रुंद अन् ७५ फूट खोल आहे. प्रकारची विहीर गुरसाळे, मेंढापूर शिवेवर बांधण्यात आलेली आहे. याशिवाय पालखी मार्गावर घुले वस्ती (पाणीव) मांडवे, शिखर शिंगणापूर घाट (ता. माळशिरस ) येथे बांधलेल्या आहेत. इसबावी (विसावा) आणि कोर्टी रोड (इसाबावी) येथे बांधल्या आहेत. २५ एकरावरील धान्य पशू-पक्ष्यांसाठी राखीव अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरीतून आजही पाणी

What's Your Reaction?






