चंदननगरमधून फळविक्रेत्याचे अपहरण:अकलुजच्या गोठ्यात नेऊन मारहाण; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुळचा साेलापूर जिल्हयातील अकलुज येथील रहिवासी आणि सध्या पुण्यातील चंदननगर परिसरात पेट्टीकाेर्ट यार्ड साेसायटीत रहाणाऱ्या एका फळविक्री करणाऱ्या 31 वर्षीय तरुणाने चंदननगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, त्यास अपहरण करुन त्यास अकलुज येथे टाेळक्याने घेऊन जाऊन जनावराचे गाेठयात डांबुन ठेवत कपडे काढून बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य ताेरसकर (रा. अकलुज), लकी, अक्षय, मेजर (पूर्ण नाव नाही), अजित ताेरसकर, राजा नाईकवडी व त्यांचे चार ते पाच सहकारी यांचेवर बीएनएस कलम 137 (2), 127 (2), 127 (8), 1४0 (3), 118,(1), 352, 351 (2), 32४ (2), 3 (5) अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पोलिसांकडे ताे बेपत्ता देखील झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीनुसार, 2४ मे राेजी दुपारी दीड वाजता ताे सियाज कार (एमएच 13 एनजे 1४93) मधुन जात असताना, सुंदराबाई शाळचे समाेर चंदननगर याठिकाणी ताे आला असताना ,पैशाचे जुन्या देवाण घेवाणीचे कारणावरुन त्याचे आेळखीचे व्यक्ती चैतन्य ताेरसकर, लकी, अजित ताेरसकर, मेजर, अक्षय, राजा नाईकवडी यांनी त्यास शिवीगाळ करुन इनाेव्हा कार मध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर त्यास अकलुज येथील एका जनावरांचे गाेठयात डांबुन ठेऊन त्यास लाकडी दांडके, पाईप, राॅड पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.मात्र, याबाबत पोलिसांना चाैकशी दरम्यान सदर तक्रारीबाबत संशय निर्माण झाला असून त्यांनी त्यादृष्टीने सखाेल तपास सुरु केला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्र्य शेंडगे करत आहे.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow