सीना नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी अभियंत्याना घेराव:नवीन पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत

प्रतिनिधी | अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाच्या बंद पडलेल्या कामाबाबत शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता अजित गायके यांना घेराव घालण्यात आला. पुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी करत, शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, ठेकेदाराला कोणतेही बिल अदा करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सीना नदीेवरील नवीन पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे शिवसेनेने या प्रकरणी निवेदन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, माजी शहरप्रमुख कदम यांच्यासह सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. पुलाचे काम सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. तसेच, सध्या या भागात विद्युत व्यवस्था नसल्याने ती तत्काळ करावी, यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Jun 2, 2025 - 03:43
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow