कोथरूडमध्ये पेंटिंग कामगाराचा मृत्यू:सुरक्षा साधनांविना काम करताना गॅलरीवरून पडला; कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल
काेथरुड परिसरातील रामबाग काॅलनी उमा महेश काे- ऑपरेटिव्ह हाैसिंग साेसायटीत इमारतीच्या पेटिंगचे काम करणारा 30 वर्षीय कामगार गॅलरीचे ग्रिलवर उभा राहून पेटिंग काम करताना ताेल जाऊन खाली पडल्याने त्याला जखमा हाेऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पेटिंगचे काॅन्ट्रॅक्टर यांचेवर काेथरुड पोलिस ठाण्यात सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगतमुरत गुलाब निषाद (वय- 30,रा. केळेवाडी, काेथरुड,पुणे) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव असून ताे मुळचा उत्तरप्रदेश मधील चित्रकुट जिल्हयातील राजापूर तालुक्यात सरधुआ येथील रहिवासी हाेता. याप्रकरणी अनिकेत ज्ञानेश्वर गढई (वय- 25,रा. कर्वेराेड,पुणे) व यशवंत प्रभाकर देशपांडे (53,रा. कर्वेनगर, पुणे) यांचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आराेपी अनिकेत गढई व यशवंत देशपांडे यांनी इमारतीचे पेटिंगचे काॅन्ट्रक्ट घेतले हाेते. परंतु कर्मचारी यांचे सुरक्षेची काेणतीही साधने न वापरता कामगारांना काम करण्यास लावले. इमारतीच्या गॅलरीच्या ग्रिलवर उभा राहून जगतमुरत निषाद काम करत असताना त्याचा ताेल जाऊन ताे खाली पडल्याने त्यास गंभीर जखमा झाल्या. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. याबाबत त्याच्या मृत्युस हयगयीने व निष्काळजीपणाने कारणीभूत झाल्याने आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी स्लीप हाेऊन तरुणाचा मृत्यु एरंडवणे परिसरात एसएनडीटी काॅलेजचे पुढे कॅनाॅल रस्त्यावर आठवले चाैकाजवळ सीजी 10 एयु 3262 या दुचाकीवर तन्मय सचिन कळंत्रे (वय- 21,रा. काेथरुड,पुणे) हा भरधाव वेगात गाडी चालवत जात असताना त्याचा मित्र सेतु सुरेंद्र सुरकार हा गाडीवर मागे बसला हाेता. सार्वजनिक रस्त्यावर आपले ताब्यातील गाडी हयगयीने, भरधाव वेगात तसेच वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन चालविल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी स्लीप हाेऊन दाेघेही रस्त्यावर पडले. या अपघातात तन्मय हा गंभीर जखमी हाेऊन स्वत:चे मृत्युस कारणीभूत झाला आहे. तर सेतु सरकार यास जखमी करण्यास व गाडीचे नुकसान करण्यास कारणीभुत झाल्याने मयत तन्मय कळंत्रे याचेवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?






