जालिंदर सुपेकरांचा बीडच्या 'आका'शी संबंध?:अंजली दमानिया यांचा नवा आरोप; वाल्मीक कराडला पाठिशी घालण्याचा केला दावा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड कारागृहात ठेवण्यात आले होते. यामागे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची थेट भूमिका असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. केवळ तुरुंगातच नव्हे, तर कराडला दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय सुपेकर यांनी विविध कारागृहांमध्ये आरोपींकडून पैशांची मागणी केली असल्याचे दमानिया म्हणाल्या. अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र, आजपर्यंत वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्यात आलेली नाही. उलट त्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे. कराड भाजप प्रवेश करणार अंजली दमानिया म्हणाल्या की, वाल्मिक कराडला मकोकामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. प्रत्येक जेलमध्ये सुपेकर यांच्याकडून पैसे मागितले जात आहेत. सुपेकर यांनी गन लायसन्स प्रकरणातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला असून, तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही त्याच प्रकरणात आरोप आहेत. 600 लायसन्स प्रकरणांपैकी 300 प्रकरणांचा अहवाल गृह विभागाकडे सादर झाला आहे. कृष्णा आंधळे फरार अंजली दमानिया म्हणाल्या की, देशमुख प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याचे मोबाईलही जप्त करण्यात आलेले नाहीत. हे स्पष्ट दाखवते की, तपासात ढिलाई केली जात आहे. कृषी खात्यातील औषध खरेदीतील 350 कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत त्या म्हणाल्या की मी या प्रकरणाची तक्रार लोकायुक्तांकडे केली असून, 16 जूनला यावर सुनावणी होणार आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही मला माहिती सादर करण्यासाठी बोलावले आहे. सरकारने जर हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, तर मी कोर्टात जाणार आहे,

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow