धनंजय मुंडे यांचे मौन व्रत!:आधी विपश्यना आता धार्मिक कार्यक्रमात सहभाग, गोपीनाथ गडावरही बोलणे टाळले

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या सहकाऱ्यांना बीड पोलिसांनी अटक केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास विरोधकांनी दबाव आणला व धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर धनंजय मुंडे हे माध्यमांपासून जरा अंतर राखून असल्याचेच दिसून आले आहे. हाताने ओठांवर बोट फिरवत मौन असल्याचे सांगीतले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे उपस्थित होते, परंतु यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना पुढे करत सर्वांच्यावतीने तूच बोल असे त्यांना सांगितले. गोपीनाथ गडावर येण्यापूर्वी ते इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात होते. आता ते नाशिकमध्ये असल्याचे समजते. यावेळी देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हाताने ओठांवर बोट फिरवत मौन असल्याचा सूचक संदेश दिला आहे. आधी विपश्यना आणि आता धार्मिक कार्यात धनंजय मुंडे गुंतले असल्याचे दिसत आहे. आज धनंजय मुंडे हे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी कोणत्याही गोष्टीवर बोलण्यास नकार दिला आहे. तसेच आज संध्याकाळी ते नाशिक येथेच एका लग्न समारंभात देखील हजेरी लावणार आहेत. परंतु धनंजय मुंडे हे कोणत्याही विषयावर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. गोपीनाथ गडावरही धनंजय मुंडेंनी बोलणे टाळले दरम्यान, दिनांक 3 जून रोजी गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ बहीण एकतर दिसून आले. तब्बल 11 वर्षांनी ते एकत्र आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे देखील काही बोलतील अशी अपेक्षा उपस्थितांना होती. परंतु, यावेळी देखील त्यांनी बोलणे टाळले. धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारपणाने देखील ग्रस्त आहेत, त्यामुळे देखील त्यांनी बोलणे टाळले असावे अशी चर्चा सुरू आहे.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow