अकोट तालुक्यामध्ये कपाशीच्या "त्या' बियाणांच्या पाकिटाचा कृत्रिम तुटवडा:बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना जावे लागते शेजारच्या जिल्ह्यात, प्रशासनाने दखल घ्यावी
तालुक्यात कापसाच्या बि-बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. पसंतीच्या बियाणांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागणार असल्याची पून्हा तीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. वळवाच्या पावसाने तालुक्यात पेरणी पूर्व मशागतील सुरुवात झाली. शेत मशागत करून पूर्ण झाल्याने बियाणे, खताची तजवीज करताना शेतकरी दिसत आहे. मागील वर्षी पसंतीच्या बियांसाठी झालेली धडपड पाहता पुन्हा तीच बाब घडू नये म्हणून शेतकरी बियाणांची खरेदीसाठी शहरात दाखल होत आहे. मात्र, यावर्षी पसंतीच्या बियाण्यांच्या बाबत तोच प्रकार घडला असून, बाजारात विशिष्ट कंपनीच्या त्या दोन बीटी वाणाचा तुटवडा निर्माण झाला. विशेषतः बाजारात शेतकऱ्यांच्या त्यांच पसंतीच्या कापसाचे बी-बियाणे गायब झाल्याचे समजते. अशातच विक्रेत्यांकडे विचारणा केल्यानंतर कापसाच्या बियाणांचे शॉर्टेज असल्याचा दावा केला जात असून, हेच विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने कापसाचे बियाणे छुप्या मार्गाने ओळखीच्या मंडळींना देवू लागले असल्याचे समजते. कापसाच्या बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने सर्रास विक्री सुरु झाली. त्यामुळे कापूस उत्पादक हादरले आहे. वास्तविकतः यावर्षी बि-बियांणांसह खतांचा तुटवडा जाणवणार नाही, असे प्रशासनाने सांगितले खरे, परंतु, पावसाने हजेरी लावण्यापूर्वीच बि-बियाण्यांचा तुटवडा निर्माण केला जात असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. नियोजन नसल्याने दरवर्षी तुटवडा डीएपी खताचा तुटवडा डीएपी या एकमेव खतावर सबसिडी आहे, पण पुरवठा अतिशय कमी आहे. त्यामुळे या खताचा तुटवडा दरवर्षी निर्माण होतो. १ हजार ३५० रुपये प्रति बॅगचा दर काळ्या बाजारात १ हजार ५०० रु ते १ हजार ६०० रुपयेपर्यंत जातो पाऊस पडल्यावर हे भाव अजून वाढतील. शेतकरी बियाणांच्या खरेदी साठी शेजारी जिल्ह्यात अनेक शेतकरी बियाणे खरेदी साठी शेजारी बुलडाणा जिल्ह्यात धाव घेत आहे.पावसाळा सुरू होण्याआधी बियाणे खरेदी करून ठेवण्याला शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहे. किंमती प्रचंड वाढल्या त्या दोन्ही बीटी कपाशीचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही बियाण्याचा काळा बाजार होतो आहे.अधिकृत भाव प्रति किलो ९०१ रु आहे, पण काळ्या बाजारात याचा दर १ हजार ४०० रुपये प्रति बॅग तर दुसऱ्याचा दर प्रति बॅग १ हजार रुपये ते १ हजार १०० रुपये असल्याची चर्चा आहे. या वाणचा पेरा ज्या जिल्ह्यात होत नाही, पण तिथे बियाणे मिळते, आशा जिल्ह्यातील गावात शेतकरी बियाणे आणण्यास जातात. त्यामध्ये बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.

What's Your Reaction?






