महिला फुटबॉलपटूंना घडवतेय इंडिपेंडंट क्लब:आजवर 14 ते 24 वर्षांपर्यंत अकादमीत घडल्या 100 महिला फुटबाॅलपटू
बालपणापासून अर्थात वयाच्या चौथ्या वर्षापासून शहरातील सायन्स कोर मैदानावर इंडिपेंडंट फुटबॉल अकादमीने महिला फुटबॉलपटू घडवण्याचा विडाच उचलला आहे. सर्वच समुदायाच्या बालिकांपासून ते २४ वर्षांपर्यंतच्या अमरावती विद्यापीठाचे नेतृत्त्व, प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला फुटबॉलपटू या अकादमीने घडवल्या आहेत. मागील काही वर्षांत जिल्हा, विभाग, राज्य आणि विद्यापीठ स्तरावर खेळणाऱ्या १०० महिला फुटबॉलपटूंना इंडिपेंडंट क्लबने घडवले आहे. चार वर्षांची बालिका ज्यावेळी १४ वर्षांखालील गटात आंतर जिल्हा स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधीत्व करते, त्यावेळी तिला फुटबॉलमधील संपूर्ण कौशल्य, नियमांची जाण असते. १४, १७ व १९ तसेच विद्यापीठ स्तरापर्यंतच्या फुटबॉलपटू येथे वर्षभर तज्ज्ञ महिला प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सराव करतात. बालिकांना फुटबॉलवर नियंत्रण, ड्रिबलिंग, किक मारणे, कॉर्नर किक घेणे, चेंडू थ्रो करणे असे प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. तसेच १४ वर्ष वयोगटापासून त्यांच्या कौशल्याला पैलू पाडण्याचे काम करण्यासोबतच शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी धावण्यासह व्यायामाचा सराव, जगभरातील उत्तम खेळाडूंच्या खेळांची माहिती दिली जाते. तसेच पेनल्टी किक, पेनल्टी शुटआऊट, लहान व लांब अंतराचे अचूक पासेस, सांघिक खेळ, गोल करण्याच्या संधींचे गोलमध्ये रुपांतर करणे असे विविध कौशल्य शिकवून घडवले जाते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अ. भा. आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला फुटबॉलपटू इंडिपेंडंट अकादमीने घडवल्या असून याच अकादमीची मोनिका कडू सध्या विद्यापीठाचे नेतृत्त्व करत आहे. एवढेच नव्हे तर ती इतर महिला फुटबॉलपटूंनाही मार्गदर्शन करत असते. तिच्या अनुभवाचा फायदा या महिला फुटबॉलपटूंना मिळतो. यंदा उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात चार वर्षांपासून ते { उर्वरित. पान ४ ^इंडिपेंडंट फुटबॉल अकादमी सर्वच वयोगटातील बालिका, मुली, महिला फुटबॉलपटूंना तज्ज्ञ महिला प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात पूर्ण क्षमतेने प्रशिक्षण देत असून त्यामुळेच आमच्याकडे उत्तम महिला फुटबॉलपटू घडत आहेत. विशेष बाब म्हणजे यात सर्वच समुदायाच्या महिला फुटबॉलपटूंचा समावेश आहे. -दिनेश म्हाला, सचिव, इंडिपेंडंट फुटबॉल अकादमी. पूर्ण क्षमतेने उत्तम महिला प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण

What's Your Reaction?






