मोर्चा काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा:काँग्रेसचा शिवसेनेवर पलटवार, ‘Who Killed Karkare’ पुस्तक वाचण्याचा दिला सल्ला

आम्ही शिवसेना आणि भाजपच्या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यालय टिळक भवन थांबून होतो, पण त्यांचा मोर्चा आमच्या कार्यालयापर्यंत आलाच नाही. जर आले असते, तर त्यांना ‘Who Killed Karkare’ हे पुस्तक सप्रेम भेट म्हणून दिले असते, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे. भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले. त्यांच्या या विधानावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे. यावर हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र शिवसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे तर पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा विचार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जिन्नाच्या मुस्लीम लिगशी युती होती, त्या मुस्लीम लिगच्या सरकारमध्ये भाजप नेते श्यामा प्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोर्चाच काढायचा तर तो फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. शिवसेनेच्या मोर्चाचे लक्ष्य चुकीचे होते भाजपने हा मोर्चा त्यांच्याच सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्याच्या घरावर काढायला हवा होता. या मंत्र्याचे भाऊ ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक आहेत, या पुस्तकात सर्व गोष्टींचा उहापोह आहेच, पण आरएसएसचा थेट संबंध कसा आहे हेही लिहिलेले आहे, त्यामुळे त्यांच्या मोर्चाचे लक्ष्य चुकीचे होते आणि हा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आलाच असता, तर त्यांना सामोरे जाऊन हे पुस्तकही त्यांना भेट दिले असते, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. फडणवीस सरकार मालेगाव प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार का? मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट व मालेगाव बॉम्बस्फोट या दोन प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. रेल्वे बॉम्ब स्फोटातील निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने लगेच जाहीर केला पण मालेगाव प्रश्नी अद्याप सरकारने भूमिका घेतलेली नाही. मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याविरुद्ध फडणवीस सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? हे त्यांनी स्पष्ट करावे. तसेच मालेगाव बॉम्बस्फोट कोणी केला याचे उत्तर मिळाले पाहिजे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. करकरे आणि आबांच्या मुलाखती पाहाव्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल महाराष्ट्राला नितांत आदर आहे, त्यांच्याबद्दल कळवळा आहे, ते शहीद झाले. दरवर्षी 26/11 ला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालता आणि आता त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करता हा देवेंद्र फडणवीस व त्यांच्या बगलबच्यांचा दुटप्पीपणा आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाच्या लोकांनी शहीद हेमंत करकरे व तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सर्व मुलाखती पहाव्यात म्हणजे स्पष्ट होईल. हेमंत करकरे, आबा असते तर... या प्रकरणात चार्जशीट कसे बदलले, या खटल्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना प्रकरण सौम्य करण्यास कोणी सांगितले होते, या घटनाक्रमाची निट सांगड घालून पहावे असे सपकाळ म्हणाले. आज हेमंत करकरे आणि आर. आर. पाटील असते, तर मालेगाव खटल्याचा निकाल वेगळा लागला असता, असेही ते म्हणाले.

Aug 2, 2025 - 21:23
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow