गाझा युद्ध:नेतन्याहूंच्या ‘बिग गाझा प्लॅन’ विरोधातलष्करप्रमुख, इस्रायलमध्ये संकट गंभीर,कट्टरपंथी सहकाऱ्यांची मागणी, गाझाचेविलीनीकरण व्हावे, ज्यू वस्त्या असाव्यात
गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर २ वर्षांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आता संपूर्ण गाझावर कब्जा करण्याच्या योजनेवर (बिग गाझा प्लॅन) काम सुरू केले आहे. मात्र, पीएम नेतन्याहू यांच्या बिग प्लॅनबाबत इस्रायली लष्करात गंभीर असहमती पुढे आली आहे. इस्रायली संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्ट. जनरल एयाल जमीर यांनी या पूर्ण कब्जा योजनेवर आपला आक्षेप नोंदवला आहे. यामुळे इस्रायली राजकारण व लष्करी नेतृत्वात तणाव अधिक वाढला आहे.गाझाच्या सुमारे ७५% भागावर इस्रायली लष्कराचे नियंत्रण आहे. आता नेतन्याहू संपूर्ण गाझावर कब्जा करू इच्छितो. नेतन्याहू सरकारचे कट्टरपंथीमंत्री गाझावर लष्करी शासन लागू करून ज्यूंची वसाहत नव्याने स्थापन करण्याची मागणी करत आहेत. कट्टरपंथी सहकाऱ्यांची मागणी: गाझाचेविलीनीकरण व्हावे, ज्यू वस्त्या असाव्यात नेतन्याहूंचे निकटवर्तीय म्हणाले- तर लष्करप्रमुखांनी राजीनामा दिला पाहिजे गाझात दररोज २८ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १८ हजार मुले ठार : युनिसेफ युनिसेफ युनिसेफच्या अहवालानुसार, गाझात इस्रायली बॉम्बवर्षाव आणि मानवी मदत रोखल्यामुळे दररोज सरासरी २८ पॅलेस्टिनी मुलांचा मृत्यू होत आहे. ऑक्टाेबर २०२३ पासून आतापर्यंत १८ हजार मुलांचा जीव गेला आहे. युनिसेफने सांगितले की, मुलांचे मृत्यू बॉम्बवर्षाव, कुपोषण आणि मदतीच्या अभावामुळे होत आहेत. स्थिती एवढी भीषण आहे की, गेल्या २४ तासांत एका मुलासह ८ जणांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ६०,९३३ लोकांचा मृत्यू झाला आणि जखमींची संख्या १.५ लाख पार झाली आहे. जर्मनीवर इस्रायल धोरण बदलण्याचा दबाव

What's Your Reaction?






