गडचिरोलीत शिवसेना शिंदे गटाची गटबाजी:शिक्षणमंत्री दादा भुसे बैठकीतून निघताच वाद उफाळला, जिल्हाप्रमुखांमध्येच हाणामारी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गटबाजी पुन्हा एकदा समोर येत आहे. पक्षांतर्गत मतभेदांमुळे अनेक नेते पक्ष बदलण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान ही गटबाजी अधिक उफाळून येते. असाच काहीसा प्रकार गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडला, जिथे शिवसेना नेते आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात शिंदे गटातील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. या दौऱ्यात, शिवसेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांमधील वाद इतका वाढला की, त्याचे रूपांतर थेट मारामारीत झाले. हा प्रकार पाहून उपस्थित स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले. या घटनेमुळे स्थानिक राजकारणातील गटबाजी आणि त्यातून निर्माण होणारे तणाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. दोन जिल्हाप्रमुखांमध्ये जोरदार राडा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यात शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सर्किट हाऊसमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक आटोपून दादा भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच, दोन जिल्हाप्रमुखांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद श्रेयवादातून सुरू झाल्याचे दिसून आले, आणि त्याचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. यावेळी शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. मंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीसाठी जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी सर्किट हाऊसमध्ये आले होते. मात्र, मंत्री निघून जाताच दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला गेला, आणि ते एकमेकांना भिडले. या घटनेमुळे शिंदे गटातील स्थानिक गटबाजी उघड झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारचा वाद समोर आल्याने पक्षाला याचा फटका बसू शकतो, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे. ग्रामस्थांनी दादा भुसेंचा ताफा अडवला आज सकाळी गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात एका भीषण अपघातात चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने चिरडले. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा गडचिरोली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर दोन मुलांना उपचारासाठी तातडीने हेलिकॉप्टरने नागपूरला हलवण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण काटली गावात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या गावकरींनी नागपूर-गडचिरोली मार्गावर तब्बल पाच तास रास्ता रोको करत वाहतूक थांबवली. याचवेळी गडचिरोली दौऱ्यावर असलेले शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची समजूत घातली. त्यांच्या मध्यस्थीनंतर वाहतूक सुरळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, या अपघातात निष्पाप मुलांचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Suraj Singh Welcome to My Profile