पुण्यात मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया:अंडी बाहेर काढू न शकणाऱ्या कासवाची प्राणघातक समस्या सोडवली, भारतात पहिल्यांदाच केली ही प्रक्रिया
श्री नावाचे मादी कासव हे गेल्या 1-2 महिन्यांपासून अनेक आरोग्य समस्यांशी संघर्ष करत होती. पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकने क्रॉनिक एग-बाइंडिंग सिंड्रोम, यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. ही दुर्मिळ प्रक्रिया नामांकित पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या शस्त्रक्रियेत चार पूर्ण तयार झालेली अंडी बाहेर काढण्यासह या कासवाला वाचवता आहे. आता बरे होऊन पुन्हा पूर्ववत वावरणे सुरू झाले आहे. नेहमी सक्रिय असणारे श्री नावाचे मादी कासव गेल्या काही महिन्यांपासून अचानक सुस्त झाले होते, या कासवाने आहाराचे सेवन देखील बंद केले होते. तळेगावजवळील सोमाटणे येथे राहणारे या पाळीव कासवाचे पालक, श्री आणि श्रीमती नामदेव यांना या कासवाच्या अंडी बाहेर पडण्याच्या जागेस सूज आल्याने श्री अस्वस्थ होत असल्याचे दिसून आले. श्रीला अशा अवस्थेत पाहणे आमच्यासाठी अतिशय वेदनादायक होते अशी प्रतिक्रिया या कासवाच्या पालकांनी व्यक्त केली. अंडी बाहेर ढकलण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु श्रीला ते अवघड ठरत होते. या कासवाला पुण्यातील द स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये नेण्यात आले. यावेळी काही चाचण्या करण्यात आल्या आणि तपासणीत दिसून आले की ‘एग बाऊडींग’ चा ( अंड बाहेर काढू न शकणे) त्रास असल्याचे लक्षात आले. या स्थितीत कासव नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकत नाहीत. अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि पूर्णपणे तयार झालेली अंडी देखील दिसून आली, तर रक्त चाचण्यांमध्ये या कासवाची हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे दिसून आले. एपिडोसिन इंजेक्शनने अंडी बाहेर काढण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले. तिला हाताने खायला देण्यात आले आणि बारकाईने त्याचे निरीक्षण करण्यात आले. प्रसूती प्रवृत्त करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेपूर्वी रक्त चाचणी करण्यात आली. श्रीने खाणे बंद केल्याने तिची शक्ती टिकवून ठेवण्यासाठी तिला हाताने खायला देण्यात आले. श्रीच्या पोटाच्या अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि अनेक तयार झालेली अंडी आढळून आली. तिचे हृदय सामान्यपणे काम करत होते, जे शस्त्रक्रियेपूर्वीचे सकारात्मक लक्षण होते. मात्र रक्त चाचण्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली, म्हणून ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी काही औषधे लिहून देण्यात आली. पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले की,श्रीची शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीक पध्दतीचा वापर करुन केली जाणार होती, जी अतिशय सुरक्षित पद्धत आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरामदायी राहण्यासाठी तिला काळजीपूर्वक इंट्युबेट करण्यात आले आणि ऑक्सिजनसह भूल देण्यात आली.तिचे वजन १.५ किलो होते. बीपी डॉप्लर आणि एसपीओ२ सेन्सर वापरून तिच्या जीवनावश्यक अवयवांचे निरीक्षण करण्यात आले.

What's Your Reaction?






